शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

युद्धामुळे परदेशी पर्यटनास खीळ; भीतीमुळे युरोपलाही ब्रेक, दुबईसह आखातातील सहली रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 15:00 IST

नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीचा हंगाम संपत असतानाच अमेरिका-इराण संघर्षामुळे दहा-बारा दिवसांत दुबईसह अन्य आखाती देशांतील पर्यटन बुकिंग थांबले आहे

गोविंद बर्गे पिंपरी : आखाती युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता पिंपरी-चिंचवडमधील पर्यटन व्यवसायावरही दिसू लागला आहे. शहरातून दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक दुबईसह मध्यपूर्वेतील देशांत फिरायला जातात. मात्र, गेल्या दहा दिवसांत अनेकांनी बुकिंग रद्द केले. युद्धामुळे निर्माण झालेल्या भीतीमुळे युरोप पर्यटनालाही प्रतिसाद कमी मिळत असल्याची माहिती ट्रॅव्हल्स एजन्सीच्या प्रतिनिधींनी दिली.

शहरात परदेशी पर्यटनाचे नियोजन करणाऱ्या सुमारे ८० ते ९० मोठ्या ट्रॅव्हल्स कंपन्या आहेत. लहान स्वरूपातील शंभरहून अधिक एजन्सी कार्यरत आहेत. शहरातील नागरिक परदेशी पर्यटनाला जातात. दुबई, अबूधाबी, कतार, ओमान, बहरीन आणि कुवेत या आखाती देशांना पर्यटकांची पसंती असते. या देशांमध्ये पर्यटनासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी योग्य मानला जातो. यंदा या कालावधीत चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र हंगाम संपत असतानाच अमेरिका-इराण संघर्षामुळे दहा-बारा दिवसांत दुबईसह अन्य आखाती देशांतील पर्यटन बुकिंग थांबले. मार्चमधील नियोजित दूर रद्द झाल्या आहेत.  युरोपातील टूरलाही शहरातून चांगली मागणी असते. मात्र आंतरराष्ट्रीय तणावामुळे अनेकांनी युरोप दौरे पुढे ढकलल्याचे ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सांगितले. 

सिंगापूरसह देशांतर्गत पर्यटन मात्र स्थिर

भूतान, नेपाळ, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, थायलंड आणि इंडोनेशिया या देशांसाठीचे बुकिंग मात्र सध्या स्थिर आहे. त्याचप्रमाणे गोवा, केरळ, हिमाचल प्रदेश, काश्मीर या देशांतर्गत पर्यटनस्थळांनाही पर्यटकांची मागणी कायम आहे.

दुबईतील आमचे पर्यटक सुरक्षित आहेत. युद्धामुळे दुबईच्या दोन टूर बुकिंग रद्द झाल्या. सध्या पर्यटकांचा कल श्रीलंका, इंडोनेशिया, सिंगापूर आणि थायलंडकडे वाढत आहे. - विकास भूजबळ, टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स व्यावसायिक

गेल्या दहा दिवसांत दुबईसह मध्यपूर्वेतील ४०० बुकिंग रद्द झाल्या. युरोप टूरची चौकशीही घटली आहे. मात्र सिंगापूर, मलेशियासह देशांतर्गत पर्यटनावर सध्या परिणाम नाही. युद्ध लांबले आणि इंधन टंचाई वाढली तर पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे - नीलम मंडलिक,संचालिका, ट्रॅव्हल्स कंपनी, चिंचवड.

English
हिंदी सारांश
Web Title : War Hits Foreign Tourism: Europe, Dubai Trips Canceled Due to Fear

Web Summary : Pimpri-Chinchwad's tourism sector faces setbacks as war fears lead to Dubai, Middle East, and Europe trip cancellations. Singapore and domestic tourism remain stable. Uncertainty looms if conflict persists.
टॅग्स :PuneपुणेUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरInternationalआंतरराष्ट्रीयtourismपर्यटनDubaiदुबईairplaneविमान