शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

Pune Rain: महिन्याभरापासून प्रतिक्षा; अखेर दहिहंडीपासून पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार सलामी

By विवेक भुसे | Updated: September 8, 2023 11:13 IST

पुणे जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाची प्रतिक्षा होती, त्यातून धरणांमधील पाणीसाठा कमी होऊ लागला होता

पुणे: गेले कित्येक दिवस प्रतिक्षा असलेल्या मॉन्सूनची पुन्हा सुरुवात झाली असून भीमा, कृष्णा खोर्‍यात पावसाने गुरुवारी सायंकाळपासून जोरदार सलामी दिली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस पडताना दिसत आहे़.

पुणे जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाची प्रतिक्षा होती. त्यातून धरणांमधीलपाणीसाठा कमी होऊ लागला होता. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील धरणे पूर्ण भरलेली नसल्याने खालच्या उजनी धरणातील पाणीसाठा वाढू शकत नव्हता.  सर्वांना पावसाची प्रतिक्षा असताना गुरुवारी सायंकाळपासून पावसाचे पुनरागम झाले आहे. पवना धरणाच्या परिसरात गेल्या २४ तासात ७३ मिमी पावसाची नोंद झाली असून धरण १०० टक्के भरले आहे़. पुणे जिल्ह्यातील अनेक धरण क्षेत्रात जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. निमगिरी येथे १६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत नारायणगाव ६९, खेड ४१.५, राजगुरुनगर २५.५, तळेगाव २३.५, चिंचवड २२, ढमढेरे १८, आंबेगाव १६, लवळे १५.५, पाषाण १४.५, भोर ११.५, एनडीए ११, शिवाजीनगर १०.५, वडगाव शेरी १०.५, लवासा ९.७ कोरेगाव पार्क ९ मिमी पासाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील धरण क्षेत्रात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस व धरणातील पाणीसाठा (टक्केवारी)

माणिकडोह - ६० मिमी, ६३ टक्केपिंपळगाव जोगे : ४० मिमी, ६८ टक्केयेडगाव : ४२मिमी, १९ टक्केवडज : ४३ मिमी, ९१ टक्केडिंबे : ५६ मिमी, ९२ टक्केघोड : ४ मिमी, १९ टक्केविसापूर : ७ मिमी, २२ टक्केचिल्हेवाडी : २६ मिमी, ५९ टक्केकळमोडी : ३२ मिमी, १०० टक्केचासकमान : २४ मिमी, ९८ टक्केभामा आसखेड : २० मिमी, ८९ टक्केवडिवळे : ६८ मिमी, १०० टक्केआंद्रा : ३० मिमी, ९९ टक्केपवना : ७३ मिमी, १०० टक्केकासारसाई : २२ मिमी, १०० टक्केमुळशी : ३२ मिमी, ८७ टक्केटेमघर : १० मिमी, ८० टक्केवरसगाव : ४ मिमी, ९९ टक्केपानशेत : ५ मिमी, ९९ टक्केखडकवासला : १ मिमी, ४५ टक्केगुंजवणी : ३ मिमी, ८८ टक्केनिरा देवघर १ मिमी, ९९ टक्केभाटघर : २ मिमी, ९५ टक्केवीर : ० मिमी, ५९ टक्केनाझरे : ० मिमी, ०० टक्के पाणीसाठाउजनी :  ३ मिमी, १८ टक्के

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसWaterपाणीDamधरणenvironmentपर्यावरणriverनदी