शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

विनाकाम तरीही वेतन

By admin | Updated: June 12, 2014 05:09 IST

लाच घेतल्याप्रकरणी, आर्थिक अपहार, कर्तव्यात कसूर आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात फौजदारी केलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर मनपा प्रशासन निलंबन कारवाई करते.

पिंपरी : लाच घेतल्याप्रकरणी, आर्थिक अपहार, कर्तव्यात कसूर आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात फौजदारी केलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर मनपा प्रशासन निलंबन कारवाई करते. वर्षभरात १९ जणांवर ही कारवाई केली. त्यांपैकी १८ जणांना निलंबन काळातही ७५ टक्के वेतन मिळते आहे. एकाला मात्र ५० टक्के वेतन दिले जात आहे. संबंधित प्रकरणाचा निपटारा होईपर्यंत त्यांना वेतन देण्याची तरतूद कायद्यात आहे.महाराष्ट्र नागरी सेवा १९८१ मधील कलम ३८ नुसार शासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्थामधील सेवेत असणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना निलंबन काळात वेतन देण्याची कायद्यात तरतूद आहे. पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा, निलंबन, बडतर्फी, सेवेतून काढून टाकणे याबाबत या कायद्यात कर्मचाऱ्यांना निलंबन काळातही विशिष्ट वेतन दिले जाते. यापूर्वी निलंबनानंतर सुरुवातीचे ६ महिने ५० टक्के वेतन, त्यानंतरच्या काळासाठी ७५ टक्के वेतन दिले जात होते. ९ मे २०१३ ला शासनाने नव्याने अधिसूचना काढून त्यात सुधारणा केली. महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यातील कलम ३८ मध्ये सुधारणा करून निलंबनानंतर ५० टक्के वेतन अदा करण्यासाठी पहिले सहा महिने ऐवजी ३ महिने अवधी असा बदल केला. तसेच त्यानंतर प्रकरणाचा आढावा घेतल्यांनतर परिस्थिती विचारात घेऊन ७५ टक्के वेतन देण्याबाबतचा निर्णय घेण्याचे कायद्यात नमूद केले आहे. त्यानुसार निलंबित कर्मचारी, अधिकाऱ्यांना सुरुवातीचे तीन महिने गेल्यानंतर प्रकरणाचा निपटारा होईपर्यंत काम न करता ७५ टक्के वेतन मिळत राहते. प्रकरणात कर्मचारी, अधिकारी दोषी आढळल्यास, शिक्षा सुनावल्यास सेवेतून काढून टाकले जाते. वेतनापोटी अदा केलेली रक्कम वसूलीचा अधिकार महापालिकेला आहे. दंडात्मक कारवाई करून काहींना रुजू करून घेतले जाते. तसेच कर्मचारी, अधिकारी निर्दोष सुटल्यास निलंबन कारवाई मागे घेऊन पुन्हा सेवेत घेतले जाते. त्यांचा सेवाकाल नियमित करून वेतनातील फरकाची रक्कमसुद्धा संबंधित कर्मचाऱ्याला द्यावी लागते. गेल्या वर्षी एकूण २५ जणांवर निलंबनाची कारवाई केली होती. त्यातील सहा जणांना दंडात्मक कारवाई करून, वेतनवाढ रोखून सेवेत सामावून घेतले आहे. (प्रतिनिधी)