शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्स अ‍ॅपवरच मतदार ‘स्लीप’

By admin | Updated: February 18, 2017 03:10 IST

यंदाची महापालिकेची निवडणूक ही खऱ्या अर्थाने ‘हायटेक’ ठरत आहे. स्लीप न मिळाल्यामुळे मतदान केंद्राकडे पाठ फिरविणाऱ्या

पिंपरी : यंदाची महापालिकेची निवडणूक ही खऱ्या अर्थाने ‘हायटेक’ ठरत आहे. स्लीप न मिळाल्यामुळे मतदान केंद्राकडे पाठ फिरविणाऱ्या मतदारराजाला मतदानासाठी बाहेर काढण्याकरिता अनोखी क्लृप्ती लढविण्यात आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरच कुटुंबातील सर्व सदस्यांचा मतदान क्रमांक आणि केंद्र कुठे आहे, याचा तपशील पाठविण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. घरबसल्या ही माहिती मिळाल्यामुळे मतदारही सुखावले असून, मतदानाचा टक्का वाढविण्याच्या या ‘हटके’ प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरू आहे.कोणत्याही निवडणुकीत कितीही चांगल्या प्रकारे नियोजन केले, तरी ऐनवेळी मतदार स्लीप वेळेत न मिळणे, मतदार यादीत नाव नसणे, मतदान केंद्र शोधण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येणे, अशा प्रकारांना नेहमीच मतदारांना सामोरे जावे लागते. मतदान केंद्रावर विविध पक्षांचे कार्यकर्ते मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांचा क्रमांक आणि केंद्र यांची माहिती देण्यासाठी केंद्राच्या बाहेर ठाण मांडून बसलेले असतात. त्यांची ही सहकार्याची भूमिका असूनही मतदार स्लीप न मिळाल्यामुळे अनेक मतदार मतदान करण्यास फिरकत नाहीत. मतदान हा लोकशाहीने दिलेला मूलभूत  हक्क आहे; मात्र तो बजावलाच गेला पाहिजे, अशी भावना अनेकांच्या मनात डोकावत  नाही. मतदार घराबाहेरच पडले नाहीत, तर हक्काची व्होटबँक हातातून जाईल, याच जाणिवेतून मतदारांची पावले केंद्राकडे वळविण्यासाठी पक्षाकडून ही क्लृप्ती लढविण्यात आली आहे. (प्रतिनिधी) टेक्नॉसॅव्ही’ मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्षांनी व्हॉट्सअ‍ॅपचा सहारा घेतला आहे. एक ते दोन आठवडे आधी स्लीपचे वाटप घरोघरी केली जाते; मात्र त्या क्वचितप्रसंगी गहाळ होण्याची भीती असते. व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठविल्यास तो सेव्ह राहत असल्यामुळे तो पाहून त्या दिवशी थेट केंद्रावरच येऊन नागरिक मतदान करू शकतात.  ज्यांना स्लीप मिळू शकलेली नाही, त्यांचाही मतदान केंद्रावर येऊन यादीत नाव शोधणे, केंद्र शोधण्यासाठीचा वेळ वाचणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.