शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादी दुरुस्तीसाठी मुदत

By admin | Updated: July 2, 2015 00:11 IST

कॅन्टोन्मेंट बोर्डाची प्रारूप मतदार यादी एक जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. नव्याने नावे समाविष्ट करणे किंवा दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना २० जुलैपर्यंत मुदत देण्यात

पुणे : कॅन्टोन्मेंट बोर्डाची प्रारूप मतदार यादी एक जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. नव्याने नावे समाविष्ट करणे किंवा दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना २० जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या बोर्डाच्या निवडणुकीच्या काळात मतदार यादीत नावे नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. दुबार आणि मृत मतदारांची नावे यादीमध्ये असल्याच्याही तक्रारी झाल्या होत्या.बोर्डाच्या कार्यालयीन अधीक्षक चित्रा गोखले म्हणाल्या, की बोर्डाच्या कर्मचाऱ्यांकडून पुन्हा घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती घेण्यात आली आहे. त्यावरून प्रारूप यादी बनविण्यात आली आहे. ही यादी एक जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. प्रारूप यादी बोर्डाच्या मुख्यालयात उपलब्ध करण्यात आली आहे. या यादीत नावे समाविष्ट नसल्यास किंवा कोणतीही दुरुस्ती असल्यास हरकतींसाठी संबंधितांना २० जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नागरिकांनी घेतलेल्या हरकतींवर बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा त्यांनी नेमलेल्या सक्षम अधिकाऱ्यासमोर सुनावणी होणार आहे. सुनावणीनंतर १५ सप्टेंबर रोजी अंतिम यादी तयार होणार आहे. बोर्डाच्या परिसरातील लोकसंख्या ७१ हजार ७८१ आहे. निवडणुकीपूर्वी ४४ हजार ८३१ मतदारांनी मतदार यादीत नावे नोंदविली होती. निवडणुकीच्या निमित्ताने बोर्डाने नावे समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया राबविली होती. त्यानंतर अंतिम मतदार संख्या ४६ हजार ३३ झाली होती. आता यादी अद्ययावत करण्याचे काम पुन्हा हाती घेण्यात आले आहे. (वार्ताहर)