शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

 टेक महिंद्रा कंपनीची बदनामी केल्याप्रकरणी विशाखा गायकवाडसह दोघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 16:29 IST

टेक महिंद्र आणि आयबीटी सोल्युशन्स कंपनीतला विशाखा गायकवाड यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

पुणे : टेक महिंद्र कंपनीत शिरून ती बंद करा, असे धमकावत त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर ते व्हाट्स अ‍ॅपवर व्हायरल करून कंपनीची बदनामी केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनीमनसेच्या विशाखा गायकवाडसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.टेक महिंद्र आणि आयबीटी सोल्युशन्स कंपनीत १९ व २१ मार्च रोजी हा प्रकार घडला होता. त्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी टेक महिंद्र कंपनीच्यावतीने सुपरवायझर संजय रामेश्वर इंगळे यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुरुवारी (दि. १९)  सायंकाळी ७ वाजता कंपनीत काम करत असताना मनसेच्या विशाखा गायकवाड (रा. वडगाव शेरी) व विजय गायकवाड (रा.वाघोली) कंपनीच्या सुरक्षा कर्मचारी यांना धमकावून कंपनीत काम करीत असलेल्या कामागरांचे लॉबीमध्ये गेले़ कंपनी बंद करा, नाही तर कंपनीतील बॉसला उचलून नेतो. उद्यापासून कंपनीच्या गेटवर माझे लोक बसतील. कंपनीतील कोणालाही बाहेर जाऊ देणार नाही़ अशाप्रकारे फिर्यादीस धमकावून कंपनीतील अधिकारी यांना कोरोना व्हायरसचे गांभीर्य नाही, असे म्हणून त्यांच्या मोबाईलमधून व्हिडीओ शूटिंग करून, त्याचा व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅपवर प्रसारित करून कंपनीची बदनामी केली़. 

दुसरी फिर्याद आयबीटी सोल्युशन्स या कंपनीचे प्रशासकीय अधिकारी राहुल मोहन शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. विशाखा गायकवाड व तिघे अनोळखी यांनी २१ मार्च रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नगर रोडवरील कंपनीमध्ये बेकायदारीत्या प्रवेश केला. कंपनीतील अधिकारी व कर्मचारी यांना दमदाटी करून कोरोना विषाणूची बाधा झाल्यास त्यास कंपनी जबाबदार राहील, असे सांगून कंपनीतील कामगारांना बाहेर काढून कंपनीचे काम बंद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक आर. ए. पाटील अधिक तपास करीत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाही कंपन्या सुरू असल्याच्या कंपनीतील कामगारांच्या तक्रारी आहेत. मात्र, अनेक कंपन्यांकडे बँकेच्या ऑनलाईन, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या सेवांचे काम आहे़ हे अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने या कंपन्या सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.०००

टॅग्स :PuneपुणेMNSमनसेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस