वसुली करणाऱ्या ग्रामसेवकाला मारहाण

By Admin | Updated: February 18, 2017 02:48 IST2017-02-18T02:48:36+5:302017-02-18T02:48:36+5:30

घरपट्टी, पाणीपट्टी वसूल मागण्यास गेलेल्या ग्रामसेवकास दमदाटी करून गालात थप्पड मारण्यात आल्याची घटना भाबवडी (ता़ भोर) येथे गुरुवारी (दि़ १६) सकाळच्यादरम्यान घडली़

The villagers recovering the recovery | वसुली करणाऱ्या ग्रामसेवकाला मारहाण

वसुली करणाऱ्या ग्रामसेवकाला मारहाण

नेरे : घरपट्टी, पाणीपट्टी वसूल मागण्यास गेलेल्या ग्रामसेवकास दमदाटी करून गालात थप्पड मारण्यात आल्याची घटना भाबवडी (ता़ भोर) येथे गुरुवारी (दि़ १६) सकाळच्यादरम्यान घडली़
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : फिर्यादी भाबवडी (ता़ भोर) येथील ग्रामसेवक खंडू साधू बनसोडे गुरुवारी (दि़ १६) नेहमीप्रमाणे सकाळी ९ वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कामकाज करण्यासाठी गेले़ त्यानंतर गावातील लोकांची थकीत पाणीपट्टी व घरपट्टी वसूल करण्यासाठी शिपाई विलास तुकाराम शिवतरे यांना घेऊन येथीलच सुनील ज्ञानोबा शिवतरे यांच्या घरासमोर गेले असता त्यांनी शिवतरे यांना घरपट्टी व पाणीपट्टी मागितली. परंतु शिवतरे यांनी माझ्या नळाला तीनच दिवस पाणी येऊन झाले आहे, असे सांगितले. यावर बनसोडे यांनी तुमची अडचण काय असेल ते तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयात येऊन सांगा, असे सांगितले़ यावर शिवतरे म्हणाले, की मी पाणीपट्टी भरणार नाही. तुला काय करायचे ते कर. तू जर गावात आलास तर जिवे मारीन, अशी धमकी सुनील शिवतरे याने करून ग्रामसेवकाच्या गालात थप्पड मारली.

Web Title: The villagers recovering the recovery