शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

विजय शिवतारे २७ वर्षांपासून कुटुंबापासून अलिप्त; पत्नी मंदाकिनी शिवतारे यांचा खळबळजनक दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 16:43 IST

संपत्ती हा वादाचा विषय नाही, विजय शिवतारेंकडून दोन वर्षांपासून सुरु असलेली मानसिक छळवणूक थांबवणे आणि मानसिक जाचातून सुटका करुन घेणे हा माझा आणि माझ्या कुटुंबाचा एकमेव हेतू आहे असल्याचेही मंदाकिनी शिवतारे यांनी म्हटले आहे. 

पुणे : पुरंदर तालुक्याचे माजी आमदार व शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले विजय शिवतारे यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे हृदयविकाराच्या झटक्यानंतर शिवतारे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना कौटुंबिक वादाने तोंड वर काढले आहे. शिवतारे यांची मुलगी ममता शिवदीप लांडे यांनी फेसबुकवरून पोस्ट लिहीत आपल्या भावांवर आरोप केले आहे. तर आता ममता यांच्या आरोपाला शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी शिवतारे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे प्रत्युत्तर दिले आहे. तसेच पती विजय शिवतारे हे गेल्या २७ वर्षांपासून कुटुंबापासून अलिप्त असून पहिली पाच वर्ष एका महिलेसोबत लग्न करुन राहत होते. त्यानंतर आजतागायत दुसऱ्या महिलेसोबत पवईला राहत आहेत” असा दावा देखील त्यांनी केला आहे. 

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरंदर तालुक्यात विजय शिवतारे यांनी शिवसेनेचे प्राबल्य वाढवले. तसेच तिथून आमदारकी मिळवत देवेंद्र फडणवीसांच्या काळात राज्यमंत्रीपद देखील भूषविले. मात्र, शिवतारे यांच्या कुटुंबात काही दिवसांपासून सुरु असलेल्या कौटुंबिक वादाने आता सार्वजनिक रूप धारण केले आहे. शिवतारे यांची मुलगी आणि दबंग पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या शिवदीप लांडे यांच्या पत्नी असणाऱ्या ममता यांनी विजय शिवतारे यांच्या फेसबुक अकाऊण्टवरुन, माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अस्वस्थ आहे अशा आशयाची पोस्ट केली आहे.

पुढे त्या म्हणतात, मागील काही दिवसांत फेसबुक वरून होत असलेल्या पोस्टने आपल्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वीही कित्येक वर्ष असाच त्रास बाबांनी सहन केला. मात्र कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. कारण त्यामुळे माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबाला हानी पोहोचेल असं त्यांना वाटत होतं व आजही वाटतं असा उल्लेख ममता यांच्या फेसबुक पोस्टमध्ये आहे. 

शिवतारे यांच्या मुलीने केलेल्या आरोपाला पत्नीचं उत्तर विजय शिवतारे यांची मुलगी ममता  शिवदीप लांडे यांनी केलेल्या आरोपाला त्यांची आई आणि शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे मुलीने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. तसंच विजय शिवतारे हे गेल्या २७ वर्षांपासून कुटुंबापासून अलिप्त राहत असून त्यातील पहिली पाच वर्ष उज्ज्वला बागवे नावाच्या महिलेसोबत लग्न करुन राहत होते. त्यानंतर आजतागायत मिनाक्षी रमेश पटेल  महिलेसोबत पवई येथे राहत आहेत. यामध्ये संपत्ती हा वादाचा विषय नाही, विजय शिवतारेंकडून दोन वर्षांपासून सुरु असलेली मानसिक छळवणूक थांबवणे आणि मानसिक जाचातून सुटका करुन घेणे हा माझा आणि माझ्या कुटुंबाचा एकमेव हेतू आहे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

संपत्ती नावावर केल्यावरही मानसिक त्रास देणे सुरूच... ममता शिवदीप लांडे आपल्या फेसबुक पोस्ट म्हणतात,मागील वर्षी जानेवारी २०२० मध्ये अत्यंत गंभीर प्रकृती असताना त्यांचे बायपास झाले हे आपणा सर्वांना माहितच आहे. डॉक्टरांनी त्यांच्या वाचण्याची शक्यता २० टक्के आहे असे सांगितले. माझा भक्कम असा आधारस्तंभ ढासळतो की काय या भीतीने माझी झोपच उडाली होती. ऑपरेशन यशस्वी झालं, मात्र त्यानंतरही जीवाला धोका असताना माझा मोठा भाऊ सतत धमक्या देऊन मानसिक त्रास देत होता. मागील दीड वर्षांपासून किडनीच्या आजारामुळे बाबा एक दिवसाआड डायलीसिसला जातात. या दीड वर्षात एकदाही माझ्या दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना भेटायला सुद्धा आले नाही. ते आहेत की नाही ? याची सुद्धा विचारपूस केली नाही. त्यांची प्रकृती नाजूक असल्याने मानसिक दबाव अजून वाढवून त्यांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरु झाले. आजवर आयुष्यभर कमावलेली सगळी संपत्ती विनय व विनस व त्यांच्या कुटुंबाच्या नावे बाबांनी केली. तरीही जेजुरीतील इथेनॉल प्लांट नावावर करून देण्यासाठी वारंवार त्यांच्याकडून दबाव टाकण्यात येत आहे. या सर्व गोष्टीत मी कायम फक्त बघ्याची भूमिका बजावत होती. मी स्वतः डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेत मी जानेवारी २०२१ मध्ये हॉस्पिटलचा राजीनामा दिला व पूर्ण वेळ बाबांसोबत राहून त्यांच्या कामाचा ताण कमी करण्याचा व आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कदाचित त्यांना बळ मिळाले आणि विनयच्या धमक्यांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. मात्र मागील दोन महिन्यांपासून तो दबाव सोशल मीडियाद्वारे बदनामी करून सतत वाढवला जात आहे. सर्व संपत्ती नावावर करूनही मानसिक त्रास कमी होत नव्हता. तो आताही अशाच बदनामीच्या धमक्या देत आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.

पुन्हा एकदा बाबा पुरंदरसाठी आपला जीव ओततील...

आपण माझ्या बाबांवर अफाट प्रेम केलंत. तेच त्यांच्यासाठी सर्वस्व आहे. ते प्रेम कधीही कमी पडू देऊ नका आणि बाबाही अविरत पुरंदरसाठी आपला जीव ओततील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. “आज सर्व काही सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आहे आणि त्याच धक्क्याने त्यांना पहाटे हृदयविकाराचा झटका आला. आयसीयूमध्ये रात्री २:०० वाजता मी त्यांना घेऊन आली, ऍडमिट केले. माझी देवाला प्रार्थना आहे ,मला बळ दे!!!,” असंही ममता लांडे यांनी नमूद केलं आहे. 

ममता शिवतारे- लांडे यांनी उपस्थित केलेले सवाल: 

*१९९४ साली घडलेल्या घटना सत्य असोत वा असत्य, आज २७ वर्षानंतर त्या का आठवाव्यात?* बाबांचा इतका द्वेष वाटत असेल तर त्यांचा राजकीय व आर्थिक व्यवहार विनय शिवतारेने २०१८ पर्यंत का सांभाळला?* बाबांनी कमावलेली संपत्ती आजवर दोघांनी निमूटपणे नावे का करून घेतली?* विनय शिवतारे आणि विनस शिवतारे यांनी स्वकर्त्वृत्वावर आजवर काय कमावलं?* वाद सर्व घरात असतात, म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली… पण मृत्यूशय्येवर असलेल्या वडिलांसोबत असा व्यवहार कितीही वाईट असले तरी कोणी   मुलगा करणे योग्य आहे का?

टॅग्स :PuneपुणेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणSocial Mediaसोशल मीडिया