शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
5
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
6
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
7
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
10
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
11
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
12
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
13
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
14
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
15
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
16
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
17
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
18
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
19
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
20
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!

विधानसभा २०१९ : ' पर्वती ' पदरात पडल्याने राष्ट्रवादीच्या इच्छूकांच्या आशा पल्लवीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 07:00 IST

पर्वती मतदार संघामध्ये १९७८ पासून आजवर जनता पार्टीचा एक, काँग्रेसचे तीन आणि भाजपाचे तीन आमदार झाले आहेत...

ठळक मुद्देइच्छूकांची संख्या पाचवर : ' महिला' चेहरा ठरु शकतो महत्वाचा

पुणे : गेल्या दशकभरापासून भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेल्या पर्वती मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा डोळा होता. परंतू, रविवारी अजित पवार यांनी पुण्यातील चार मतदार संघ राष्ट्रवादीला सोडल्याची माहिती दिली. त्यामध्ये पर्वतीचा समावेश असल्याने इच्छूकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तिकीट वाटपात ' महिला ' चेहरा देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जाण्याची शक्यता असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. पर्वती मतदार संघामध्ये १९७८ पासून आजवर जनता पार्टीचा एक, काँग्रेसचे तीन आणि भाजपाचे तीन आमदार झाले आहेत. यामध्ये शरद रणपिसे आणि माधुरी मिसाळ यांना सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याची संधी मतदारांनी दिली. संमिश्र लोकवस्तीच्या या मतदार संघामध्ये भाजपा आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांचा परंपरागत मतदार आहे. गेली दहा वर्षे हा मतदार संघ भाजपाकडे आहे. मोदी लाटेमध्ये २०१४ साली मोठ्या फरकाने भाजपाने पर्वतीचा हा गड राखला होता. त्याला प्रत्त्यूत्तर देण्यासाठी काँग्रेसचे आबा बागूल, राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम तयारी करीत होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार की नाही याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. काँग्रेसकडून बागूल आणि राष्ट्रवादीकडून कदम यांनी पक्षाकडे आपण लढण्यास इच्छूक असल्याचे सांगितले होते. आघाडी न झाल्यास २०१४ च्या निवडणुकांप्रमाणे वेगवेगळे लढण्याची तयारीही इच्छूकांकडून केली जात होती. दरम्यान, २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकांसाठी आघाडी झाल्यावर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ फळीतील नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबतचे सूत्र ठरल्यावर आता केवळ औपचारिकपणे जागांच्या वाटपाची घोषणा बाकी आहे. राष्ट्रवादीला पुण्यातील पर्वती, खडकवासला, हडपसर आणि वडगाव शेरी मतदार संघ आले आहेत. शहर राष्ट्रवादीला याची आधीच कल्पना मिळाली होती. त्यानुसार चारही मतदार संघांच्या बैठका गुपचूप घेण्यात आल्या. रविवारी पक्षाच्या मेळाव्यात अजित पवारांनी यावर शिक्कामोर्तब केल्यावर पर्वतीमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खूश झाले आहेत. पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या पाचवर गेली आहे. यामध्ये नगरसेविका अश्विनी कदम, त्यांचे पती आणि मतदार संघाचे अध्यक्ष नितीन कदम, शशिकांत तापकीर, संतोष नांगरे आणि अर्चना हनमघर यांचा समावेश आहे. यामध्ये दोन ओबीसी चेहरे आहेत. पुणे जिल्ह्यामधून राष्ट्रवादीकडे केवळ पर्वती मतदार संघात महिलांनी उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकतरी महिला उमेदवार देण्याचा पक्षाचा विचार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ====सुभाष जगतापांच्या नकारामुळे मार्ग मोकळापक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगताप यांनी २०१४ साली राष्ट्रवादीकडून पर्वतीमधून निवडणूक लढविली होती. दोन वर्षांपुर्वी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आपण पर्वती विधानसभा लढविणार नसल्याचे स्पष्ट केले होते. जगताप सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ  मतदार संघामधून इच्छूक आहेत. त्यांनी पर्वतीमधून लढण्यास नकार दर्शविल्याने अन्य इच्छूकांचा मार्ग मोकळा झाला आहे. 

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूक