Video : गुळूंचे येथील रायबाचामळा येथे घराच्या अंगणात पडली वीज 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 09:23 PM2021-05-29T21:23:29+5:302021-05-29T21:23:53+5:30

वीज पडण्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये झाला कैद

Video rain lightning fell in the yard of a house at Raibachamala in Gulunche | Video : गुळूंचे येथील रायबाचामळा येथे घराच्या अंगणात पडली वीज 

Video : गुळूंचे येथील रायबाचामळा येथे घराच्या अंगणात पडली वीज 

googlenewsNext
ठळक मुद्देवीज पडण्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये झाला कैद

नीरा : गुळूंचे (ता.पुरंदर) येथील रायबाचामळा येथील राहत्या घराच्या अंगणात वीज पडली. संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान कडक्याच्या आवाजात वीज पडल्याने घरांना हादरे बसले. परिसरातील घरातील लोकांना वीजेचा झटका बसला, पण कोणतेही गंभीर नुकसान झाले नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. याचे मोबाईल मध्ये चित्रीकरणही झाले. मागील महिन्यातही शेजारच्या गावातीलच कोंडेवाडी येथेही नारळाच्या झाडावर वीज पडून झाडाने पेट घेतला होता. 

गुळुंचे येथील रायबाचामळा येथे वीज पडली. आज शनिवारी सायंकाळी ढग दाटून आले होते. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली होती. याचे व्हिडीओ मोबाईलद्वारे संजय बबन निगडे करत होते. याच दरम्यान अचानक वीजेचा गोळा अंगणात येताना मोठा आवाज झाला. 



अंगणातील तुळशीवृंदावन व नारळाच्या झाडाच्या मागे ही वीज पडली. वीज पडतेवेळी दिलीप निगडे, संजय निगडे व समोरच राहणाऱ्या संदिप निगडे यांच्या कुटुंबातील लोकांना वीजेचा झटका बसला लाईटचा शॉक लागतो तसा झटका काही क्षण बसल्याचे संदिप निगडे यांनी सांगितले. दैव बल्लत्तर म्हणून कोणीही जखमी झाले नाही अथवा कोणतेही नुकसान झाले नसल्याचेही ते म्हणाले. 

Web Title: Video rain lightning fell in the yard of a house at Raibachamala in Gulunche

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.