शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

Video : ऐन दुष्काळात पुण्यातील रस्त्यावर धोधो पाणी; 10 तासांपासून पाईपलाईन फुटलेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 10:46 IST

विमाननगर चौक परिसरात दत्त मंदिराजवळ पाईपलाईन फुटून लाखो लीटर पाणी वाया गेले.

पुणे : पुणेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरायला लावणाऱ्या महापालिकेने गुरुवारी रात्री मध्यरात्रीपासून रस्त्यावर हजारो लीटर पाणी वाया घालविल्याचा प्रकार समोर आला आहे. विमाननगर भागात व्हॉल्व फुटल्याने रात्री 11.30 पासून सकाळपर्यंत धोधो पाणी वाहत होते. 

सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाण्याचे उंच कारंजे उडत होते.  गुरूवारी रात्री साडेअकरा वाजल्यापासून पाणी वाहत असल्याची माहिती  स्थानिकांनी दिली मात्र हि बाब  आज सकाळी सात वाजता पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांना समजली. तक्रार देऊनही तातडीने कारवाई न झाल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली.  सकाळी पाण्याची गळती रोखली असून दुरूस्तीचे काम सुरू आहे. संपुर्ण शहरात पाणीकपातीचे संकट असताना अशा प्रकारे पाणीपुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. याप्रकरणी जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे

अचानक पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती झाल्यामुळे संपुर्ण विमाननगर परिसर जलमय झाला आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना रात्री जोरदार पाऊस झाल्याचे वाटत होते. मात्र, वस्तूस्थिती कळल्यावर पालिकेच्या नावे संताप व्यक्त करण्यात येत होता. दुष्काळामध्येच एशा प्रकारे पाण्याची नासाडी करणे कितपत योग्य असा सवालही विचारण्यात येत होता. 

विमाननगर दत्त मंदिर चौकात हाकेच्या अंतरावर स्थानिक नगरसेविका व नगरसेवक राहतात. शिवाय उपमहापौरांचे निवासस्थान देखील विमाननगर प्रभागातच आहे. तर नगररोडच्या लागलीच पलिकडे आमदारांचे निवासस्थान आहे. एवढे माननीय असणाऱ्या विमाननगर प्रभागात लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतो याबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्याशी संपर्क  स्थानिक नागरिकांनी अनेकदा संपर्क करून देखील त्याची नोंद घेतली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे या संदर्भात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सुरूवातीला "व्यस्त" व नंतर "सध्या पोहचू शकत नाही " असा अनुभव आला. तर पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्हि.जी. कुलकर्णी यांना सकाळी दहा वाजता हा प्रकार समजला. एकंदरीतच लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली तरी लोकप्रतिनिधी व प्रशासन याबाबत ढिम्म असल्याचे दिसून येते.

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळPuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका