VIDEO: पुणे-सोलापूर महामार्गावरील भीषण अपघात; दोन ठार तर एक गंभीर, घटना CCTV मध्ये कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 14:18 IST2023-06-21T13:46:36+5:302023-06-21T14:18:23+5:30

पल्सर मोटार सायकलची जोरात धडक बसून अपघात झाला.

VIDEO: Horrific accident on Pune-Solapur highway; Two killed and one seriously, incident captured on CCTV | VIDEO: पुणे-सोलापूर महामार्गावरील भीषण अपघात; दोन ठार तर एक गंभीर, घटना CCTV मध्ये कैद

VIDEO: पुणे-सोलापूर महामार्गावरील भीषण अपघात; दोन ठार तर एक गंभीर, घटना CCTV मध्ये कैद

केडगाव (पुणे) : यवत (ता- दौंड) येथे  पुणे-सोलापूर महामार्गावर एका दुचाकीने पादचाऱ्याला दिलेल्या धडकीमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे व एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी ( २० जून) रोजी रात्री ९.३० च्या सुमारास घडली.

यासंदर्भात सोमनाथ भाऊ मदने (वय ५५ वर्षे व्यवसाय - शेतमजुरी राहणार रा. दापोडी, दौंड जि. पुणे) यांनी यवत पोलिसांना फिर्याद दिली आहे. फिर्यादींचा मुलगा दादासाहेब मदने हा कामानिमित्त यवत येथे गेला होता. रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास दादासाहेब सोमनाथ मदने हा यवत गावातील जनसेवा मेडिकलचे समोर सोलापूर-पुणे हायवे रोड पार करून जात असताना त्यास पुणे बाजुकडून सोलापुर बाजुकडे जात असलेल्या एका काळ्या रंगाची बजाज कंपनीची पल्सर मोटार सायकलची जोरात धडक बसून अपघात झाला.

अपघातात दादासाहेब मदने याला डोक्याला, तोंडाला, पायाला मार लागल्याने त्याला यवत गावातील सरकारी दवाखान्यात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. तसेच बजाज कंपनीची प्लसर मोटार सायकल वरील प्रज्वल महेंद्र शेळके व विवेक विकास बारवकर (दोंन्ही रा.केडगांव ता.दौंड जि.पुणे) यांना डोक्यास, हाता पायास मार लागल्याने त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रात्री उशिरा प्रज्वल शेळके यांचा अपघातात मृत्यू झाला.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: VIDEO: Horrific accident on Pune-Solapur highway; Two killed and one seriously, incident captured on CCTV