Video : सर्पमित्राच्या गाडीतच विषारी घोणस सापाने दिला २७ पिल्लांना जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 18:32 IST2025-06-25T18:31:10+5:302025-06-25T18:32:40+5:30

पावसाळ्यामुळे सापांचे प्रमाण वाढले असताना, वाघेश्वर डेअरीजवळ एक मोठा साप दिसल्याची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख यांना मिळाली.

Video A venomous cobra gave birth to 27 pups in a snake lover car | Video : सर्पमित्राच्या गाडीतच विषारी घोणस सापाने दिला २७ पिल्लांना जन्म

Video : सर्पमित्राच्या गाडीतच विषारी घोणस सापाने दिला २७ पिल्लांना जन्म

शिक्रापूर (ता. शिरुर):साप पकडण्यासाठी झटणाऱ्या सर्पमित्राच्या वाहनातच एक अजब घटना घडली. कारमध्ये ठेवलेल्या बरणीत असलेल्या घोणस जातीच्या सापाने थेट २७ पिल्लांना जन्म दिला. हा दुर्मीळ आणि थरारक अनुभव शिक्रापूर परिसरातील मलठण फाट्याजवळ घडला.



पावसाळ्यामुळे सापांचे प्रमाण वाढले असताना, वाघेश्वर डेअरीजवळ एक मोठा साप दिसल्याची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून अतिविषारी घोणस जातीच्या सापाला काळजीपूर्वक पकडले आणि एका सुरक्षित बरणीत बंद करून स्वतःच्या कारमध्ये ठेवले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा हा साप मोकळ्या नैसर्गिक ठिकाणी सोडण्यासाठी बरणी उघडली गेली, तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला, आतच २७ छोट्या पिल्लांना जन्म दिला होता.

ही माहिती शिरुर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे आणि नियतक्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील यांना दिल्यानंतर, त्यांच्यासह निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्था व नेचरगार्ड ऑर्गनायझेशनच्या सदस्यांनी मिळून ही सापाची आई आणि तिची सर्व पिल्लं सुरक्षितपणे निसर्गात सोडली. या घटनेमुळे सर्पमित्रांच्या कामातील धोके आणि निसर्गाची गूढता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

 

Web Title: Video A venomous cobra gave birth to 27 pups in a snake lover car