शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
6
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
7
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
8
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
9
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
10
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
11
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
12
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
13
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
14
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
15
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
16
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
17
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
18
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
19
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
20
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

पाटी-पेन्सिल नामशेष होण्याच्या मार्गावर : इंग्रजी माध्यम शिक्षण पध्दती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 12:48 PM

इंग्रजी माध्यमांच्या शाळेत नर्सरीपासून ते प्राथमिक शिक्षण देण्यासाठी पाटी, आणि पेन्सिलचा (लेखन) वापर होताना दिसत नाही.

ठळक मुद्देपाटीकडून टॅबकडे वेगाने प्रवास करणारी शिक्षण प्रणाली

पुणे : शाळा सुटली पाटी फुटली, आई मला भूक लागली, असे सहजपणे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या ओठांवर येणारे बडबडगीत विस्मरणात जाण्याच्या मार्गावर आहे. आधुनिक शैक्षणिक साहित्यातून प्राथमिक शिक्षणाला सुरुवात करणारी पाटी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाठवण्याकडे पालकांचा कल अधिक दिसून येतो. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत नर्सरीपासून ते प्राथमिक शिक्षण देण्यासाठी पाटी, आणि पेन्सिलचा (लेखन) वापर होताना दिसत नाही. परिणामी, इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना पाटी आणि लेखन (पेन्सिल) ही कालबाह्य संकल्पना वाटते. पाटीचा वापर कमी झाल्यामुळे बाजारात विविध आकर्षक रंगात मण्याच्या माळात अडकलेली पाटी दिसेनाशी होत चालली आहे.

 प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे, असे तज्ज्ञांचे मत आहे. पण इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याचे  प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत  प्राथमिक  शिक्षणात पाट्यांचा वापर काही प्रमाणात दिसून येतो. पूर्वी प्राथमिक शिक्षण हे पाटीशिवाय अपूर्ण असायचे. पाटीवरच विद्यार्थ्यांचा अभ्यास होत होता. विद्यार्थीदेखील पाटीसाठी पालकांकडे हट्ट धरत असत. शाळा सुटली पाटी फुटली असे म्हणत, आनंदाने उड्या मारत घरी जाणारे विद्यार्थी आता दिसेनासे होत चालले आहेत. ..........काळानुसार शिक्षण पद्धत बदलली. त्याबरोबरच शैक्षणिक साहित्यातदेखील बदल झाले. अभ्यास करण्याठी नवनवीन साधने आज उपलब्ध आहेत. टॅॅब, संगणक, प्रोजेक्टर या साधनांचा वापर करून शाळेत शिक्षण दिले जात आहे. नवीन शैक्षणिक पद्धतीमुळे पाटी कालबाह्य होत आहे.- मुकुंद फुंदे, प्राथमिक शाळा शिक्षक........सद्यस्थितीत पाटीची मागणी कमी झाली आहे. पूर्वी विविध पद्धतीच्या पाट्या विक्रीसाठी बाजारात असायच्या. आता मागणी कमी झाल्यामुळे बहुतांश विक्रेते पाट्या विक्रीसाठी ठेवत नाहीत.- विनोद पाटील, शालेय साहित्य विक्रेते ......संकल्पना वाटते. पाटीचा वापर कमी झाल्यामुळे बाजारात विविध आकर्षक रंगात मण्याच्या माळात अडकलेली पाटी दिसेनाशी होत चालली आहे.  प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे, असे तज्ज्ञांचे मत आहे. पण इंग्रजी चौरसाकृती, आडवे, उभे, रकाने असलेले एक रेघी, दोन रेघी, तीन रेघी, चार रेघी, वही बाजारात सहज  उपलब्ध आहे. त्यामुळे वहीचा वापर वाढला. पाटीचा वापर कमी झाला.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षणGovernmentसरकार