शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पाटस टोलनाक्यावरील वाहने अडवली : ग्रामस्थांनी केले आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2019 7:16 PM

टोलनाका प्रशासनाच्या उदासिन धोरणाचा फटका ग्रामस्थांना बसत आहे

ठळक मुद्देटोलनाका प्रशासनाच्या आडमुठे धोरणाचा केला निषेध  सोमवारी टोलनाक्यात कचरा टाकणार

पाटस : टोलनाका प्रशासनाच्या आडमुठे धोरणाचा निषेध करण्यासाठी शनिवारी पाटस ग्रामस्थांनी टोलनाक्यावर येत महामार्ग रोखून धरला. पाटसचे ग्रामपंचायत सदस्य मिलिंद दोशी, जनसेवा तरुण मंडळाचे अध्यक्ष संभाजी देशमुख यांच्या पुढाकाराने हे आंदोलन झाले. टोलनाका प्रशासनाच्या उदासिन धोरणाचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. वास्तविक पाहता स्थानिक लोकांकडून टोल घेऊ नये, असे असतानादेखील स्थानिक लोकांकडून टोल घेतला जातो; तसेच टोलनाक्याच्या हाकेच्या अंतरावर बारामतीला जाण्यासाठी वेगळा मार्ग निघतो. तरीदेखील बारामतीला जाणाऱ्या वाहनांकडून टोल घेतला जातो. हा टोल घेऊ नये म्हणून वेळोवेळी ग्रामपंचायतीने, ग्रामस्थांनी टोलनाक्याला कळविलेले आहे. तरीदेखील दादागिरी करून टोल घेतला जातो. या निषेधार्थ टोलनाक्याच्या विरोधात अनेक आंदोलने झाली. त्यातच संतापलेल्या ग्रामस्थांनी शनिवारी दुपारी वाहने रोखून धरली. टोलनाक्यातील अधिकारी चर्चेला येत नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी या वेळी केला. ग्रामस्थांशी चर्चा करायला एकही अधिकारी आला नाही. परिणामी, टोलनाक्याच्या कार्यालयाकडे जाणाºया गेटला कायम कुलूप लावलेले असते. त्यामुळे ग्रामस्थांना अधिकाºयांना भेटायला जाता येत नाही. त्यामुळे अधिकारी सुटीवर आहे, असे चुकीचे निरोप दिले जातात.  येथील कामगारांना देखील तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत असल्याची चर्चा आज टोलनाक्याच्या परिसरात होती...............  सोमवारी टोलनाक्यात कचरा टाकणारपाटस गावातील उड्डाण पुलाजवळील स्वच्छता आणि साफसफाई याची देखभाल पाटस टोलनाक्याकडे आहे. साधारणत: एक किमीच्या अंतरावरील या पुलाच्या दोन्ही बाजूला घाणीचे साम्राज्य असते. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान, पुलाजवळील घाण, कचरा रविवार (दि.२) पर्यंत साफ केला नाही, तर सोमवार (दि.३) रोजी ग्रामस्थ सर्व कचरा उचलून हा कचरा टोलनाक्याच्या कार्यालयात आणून टाकणार असल्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य मिलिंद दोशी, जनसेवा तरुण मंडळाचे अध्यक्ष संभाजी देशमुख यांनी टोलनाका प्रशासनाला दिला आहे.  

टॅग्स :Puneपुणेtollplazaटोलनाका