लॉकडाऊनकाळात देखील शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच; बिबवेवाडीत तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 04:38 PM2021-05-18T16:38:43+5:302021-05-18T16:39:27+5:30

बिबवेवाडी भागात टोळक्याने नागरिकांच्या वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली.

Vehicle vandalism incidents continue in the city even during the lockdown; crime filed in Bibwewadi | लॉकडाऊनकाळात देखील शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच; बिबवेवाडीत तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल

लॉकडाऊनकाळात देखील शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच; बिबवेवाडीत तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल

Next

पुणे : लॉकडाऊन असतानाही टोळक्यांकडून शहराच्या वेगवेगळ्या टोळक्यांकडून खुन, खुनाचे प्रयत्न तसेच दहशत माजविण्याचे प्रकार सुरु आहेत. बिबवेवाडी भागात टोळक्याने नागरिकांच्या वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली.

याप्रकरणी रणजीत राजू सावंत (वय १९), आदेश राजेंद्र गोरड (वय २१, दोघे रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरीनाथ दारवटकर (वय ५८, रा. राजीवगांधीनगर, बिबवेवाडी) यांनी याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सावंत, गोरड आणि साथीदार दोन दिवसांपूर्वी राजीव गांधीनगर परिसरातील दत्तमंदिर चाळीत रात्री साडेनऊच्या सुमारास आले. त्यांनी या भागातील रहिवाशांना शिवीगाळ केली. हातातील काठ्या आणि सिमेंटचे गट्टू वाहनांवर फेकले. नागरिकांना दमदाटी करून आरोपी पसार झाले. 

पसार झालेल्या दोघांना अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे तपास करत आहेत.

Web Title: Vehicle vandalism incidents continue in the city even during the lockdown; crime filed in Bibwewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.