पाईट (पुणे) : खेड तालुक्यातील तिसऱ्या श्रावणी सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कुंडेश्वराच्या दर्शनाला जाताना भाविकांनी खचाखच भरलेले पिकअप वाहन १०० ते १५० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात १० महिलांचामृत्यू झाला असून, ३० जण जखमी झाले आहेत.
शोभा ज्ञानेश्वर पापळ (वय २७), शारदा रामदास चोरगे (वय ४२), सुमन काळुराम पापड (वय ३९), शकुंतला तानाजी चोरगे (वय ५५), संजीवनी कैलास दरेकर (वय ५०), ज्ञानेश्वर दरेकर (वय ५५), फसाबाई प्रमु सावंत (वय५५), मंदा कानिफ दरेकर (वय ५७), मीराबाई संभाजी चोरघे (वय ५८) आणि पार्वताबाई दत्तू पापळ (वय ६२, सर्व रा. पापळवाडी पाईट) या महिलांचाअपघातामध्येमृत्यू झाला, तर चित्र शरद करंडे (वय ३२), चंद्रभागा दत्तात्रय दरेकर (वय ६५), मंदा चांगदेव पापल (वय ५५), लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर (वय ५५), कलाबाई मल्हारी लोंढे (५५), कविता सारंग चोरगे (३५), सिद्धिकार रामदास चोरघे (वय २१), छबाबाई निवृत्ती पापळ (वय ६०), मनीषा दरेकर, लक्ष्मी चंद्रकात कोळेकर, कलाबाई मल्हारी लोंढे, चालक ऋषिकेश रामदास करंडे, जनाबाई करंडे, सुप्रिया लोंढे, निशांत लोंढे, सुलोचना कोळेकर, लता करडे, बायडाबाई दरेकर, अलका शिवाजी चोरघे, रंजना दत्तात्रय कोळेकर, मालूबाई लक्ष्मण चोरघे, जया बाळू दरेकर, लता करंडे, ऋतुराज कोतवाल, निकिता पापळ, जयश्री पापळ, सिद्धी ज्ञानेश्वर पापळ, सुलाबाई बाळासाहेब चोरगे, पूनम वनाजी, जाईबाई वनाजी, अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, श्रावणी सोमवार असल्याने पाईटपासून सहा किमी अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र कुंडेश्वर येथील भगवान श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी पाईट येथील पापळवाडी येथून ३५ महिला व काही मुले-मुली असे एकूण ४० जण पिकअप (क्र. एमएच १४ जीडी ७२९९) मधून निघाले होते. सकाळी ११ वाजता कुंडेश्वर डोंगराच्या पहिल्या वळणावर गाडीमध्ये अतिरिक्त बोजा झाल्याने चालक ऋषिकेश करंडेला गाडी काही चढत नव्हती. तरीही तसेच गाडी रेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी मागे सरकत आली अन् थेट १०० ते १५० फूट खोल दरीमध्ये कोसळली. गाडीने दोन पलट्या घेतल्याने गाडीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी असल्याने एकमेकावर पडून त्याचप्रमाणे गाडीतील लोखंडी अँगल लागल्याने काही महिला गंभीर जखमी झाल्या.
चालकाची चुकी
चालकाच्या चुकीमुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. या पिकअप मध्ये जवळपास ४० महिला कुंडेश्वर येथे देवदर्शनासाठी जात होत्या. घाटात पिकअप वाहनाचा गिअर टाकताना नादुरुस्त होऊन वाहन रिव्हर्स येऊन दरीत कोसळले. नऊ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शासन या कुटुंबीयांना मदत करणार आहे. मात्र या कुटुंबातील घरातील व्यक्ती गेल्याने भरपाई न येण्यासारखी असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे-पाटील यांनी सांगितले.