शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

Vasant More: "ऑडी, BMW घेऊन आज फिरतोय, पण वडिलांच्या 'या' सायकलची सर येणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 14:13 IST

या सायकलची सर आज माझ्याजवळ असलेल्या ऑडी, बीएमडब्लू यांसारख्या महागड्या कारलाही नाही, असे भावनिक शब्द त्यांनी वर्णन केले आहेत. 

पुणे - नाराज माणूस नेहमीच लहान-सहान आणि जुन्या गोष्टींमध्ये आपला आनंद शोधत असतो. अनेकदा, पैसा-ऐशोआराम आणि सुखसोयीही त्यांस फिक्या वाटू लागतात. आपल्या वडिलोपार्जित वस्तू किंवा जुन्या, बालपणीच्या मित्रांसमेवत रमण्यात त्याला सर्वाधिक आनंद वाटतो. गेल्या काही दिवसांमाणूस मनसेमध्ये नाराज असलेल्या नगरसेवक वसंत मोरेंनीही आपल्या वडिलांच्या सायकलची आठवण शेअर केली आहे. या सायकलची सर आज माझ्याजवळ असलेल्या ऑडी, बीएमडब्लू यांसारख्या महागड्या कारलाही नाही, असे भावनिक शब्द त्यांनी वर्णन केले आहेत. 

राज ठाकरेंचे (Raj Thackeray) कट्टर समर्थक आणि मनसेचे नेते वसंत मोरे (MNS Vasant More) यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवल्यावर साईनाथ बाबर यांची शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर वसंत मोरे पुण्यातील पक्षाच्या काही कार्यकर्त्यांवर नाराज असल्याचे दिसून आले होते. मला पक्षातून डावललं जातंय. अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती. तसेच मी शेवटपर्यंत राजमार्गावरच राहणार, असं स्पष्टीकरण वसंत मोरे यांनी दिलं आहे. मात्र, वसंत मोरे आजही नाराज असल्याचे दिसून येतात. त्यामुळेच, सध्या ते जुन्या आठवणीत रममाण झाल्याचे दिसून आले. 

वसंत मोरेंनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये, त्यांच्या वडिलांनी वापरलेली 30 वर्षांपूर्वीची सायकल दिसून येते. या सायकलीला एक कुऱ्हाडदेखील अडकवलेली आहे. या फोटोसह त्यांनी जुन्या आठवणी शब्दात वर्णन केल्या आहेत.  ''या सायकलच्या मागील कॅरिअरवर अनेक दिवस रात्री, अनेक वर्षे बसून फिरलोय. ही सायकल कमीत कमी ३० वर्षांपूर्वीची आहे. कुऱ्हाडही अजून तीच आहे. सगळी प्रॉपर्टी विकली तरी हिची सर येणार नाही. कारण जेव्हा गमावण्यासारखे जवळ काहीच नव्हते तेव्हा फक्त हीच होती. भले आज माझ्याकडे Audi ,BMW, इनोव्हा, harley Davidson आहे पण त्यामध्ये बसण्यासाठी मला त्या सायकलवर घेऊन फिरणारा वाघासारखा माझा बाप आज नाही. म्हणून ही सायकल मी अजून जपून ठेवली आहे,'' अशी आठवण त्यांनी शेअर केली आहे. 

दरम्यान, वसंत मोरेंच्या पोस्टमधून त्यांना आज वडिलांची आठवण झाल्याचे दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून ते मनसेत, काही पदाधिकाऱ्यावर नाराज आहेत. अशा या नाराजीच्या क्षणावेळी सर्वात मोठा आधार असतो तो आपल्या आठवणींचा, आपल्या भूतकाळाचा आणि  आपल्या तत्कालीन परिस्थितीचा. वसंत मोरेही त्याच आठवणीत रममाण होऊन आनंद शोधत असल्याचे या ट्विटरर पोस्टवरुन दिसून येते.  

टॅग्स :MNSमनसेPuneपुणेcarकार