शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

जलशिवार योजना पुरंदरला वरदान

By admin | Updated: September 22, 2015 03:21 IST

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पुरंदर तालुक्यात करण्यात आलेले बहुतांश बंधारे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरल्याने ही योजना पुरंदरसारख्या दुष्काळी तालुक्याला वरदान ठरली असल्याचे चित्र आहे

नारायणपूर : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पुरंदर तालुक्यात करण्यात आलेले बहुतांश बंधारे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरल्याने ही योजना पुरंदरसारख्या दुष्काळी तालुक्याला वरदान ठरली असल्याचे चित्र आहे. या अभियानांतर्गत तालुक्यात ३०९ कामे मंजूर झालेली असून त्यापैकी तब्बल १९० कामे पूर्ण झाली आहेत. राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज या कामांची तालुक्यातील गावोगावी जाऊन पाहणी केली. अनेक बंधारे तुडुंब भरून वाहत असल्याचे पाहून शिवतारे यांनी समाधान व्यक्त केले. पुरंदर तालुक्यातील दिवे, सोनोरी, पानवडी, सटलवाडी, एखतपूर-मुंजवडी, साकुर्डे, काळदरी, देवडी, हिवरे, मांढर, टेकवडी, परिंचे, गुळुंचे, नावळी, वाळूंज, नवलेवाडी, पिंगोरी, वाल्हा, तक्रारवाडी, शिवरी, पांडेश्वर आदी गावांचा या योजनेत समावेश आहे. या गावांमध्ये नवीन सिमेंट बंधारे, गाळ काढणे, खोलीकरण करणे, बंधारा दुरुस्ती करणे, बांध-बंदिस्ती अशी अनेकविध स्वरूपाची कामे हाती घेण्यात आली आहेत. शिवतारे म्हणाले, की दुष्काळमुक्तीसाठी १९६२नंतर अनेक आयोग नेमले गेले; पण त्यांच्या शिफारसी बासनात गुंडाळण्यात आल्या. या सगळ्या बाबींचा अभ्यास करून अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना, मी ही योजना शासनाला सुचवली होती. प्रायोगिक तत्त्वावर पुरंदर तालुक्यात ही योजना राबवावी आणि यश पाहून नंतर राज्यात हा पॅटर्न राबवावा, असेही मी सुचवले होते. शासनाने त्या वेळी उदासीनता दाखवली; मात्र राज्यात युतीचे सरकार आल्यावर ही योजना प्रामुख्याने हातात घेण्यात आली. राज्यभर त्याचे यश दिसत असून, अनेक गावे जलयुक्त होत आहेत. भूगर्भातील पाणीसाठा वाढण्यासाठी याची मोठी मदत झाली आहे. सत्ता गेल्यामुळे कामधंदा न उरलेले अनेक उतावीळ विरोधक माझ्यावर टीका करत होते. त्यांना माझी कामगिरी हेच उत्तर असेल असेही शिवतारे म्हणाले.