शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

वाल्मीक कराड अखेर शरण...! पुण्यातील सीआयडी मुख्यालयात स्वत:च्या गाडीने हजर, तीन तास कसून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 06:24 IST

सीआयडीचे अपर पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी त्याची तीन तास चौकशी केली. त्यानंतर सीआयडीचे पथक कराडला घेऊन केजकडे रवाना झाले. रात्री उशिरा पथक केजला दाखल झाले.

पुणे/केज : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला वाल्मीक कराड हा मंगळवारी सीआयडीसमोर शरण आला. दोन दिवसांपासून तो शरण येण्याच्या चर्चा होत्या. अखेर सोमवारी रात्री अक्कलकोट स्वामींचे दर्शन घेऊन तो सकाळी पुण्यात दाखल झाला व दुपारी सव्वाबारा वाजता सीआयडी मुख्यालयात आल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सीआयडीचे अपर पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी त्याची तीन तास चौकशी केली. त्यानंतर सीआयडीचे पथक कराडला घेऊन केजकडे रवाना झाले. रात्री उशिरा पथक केजला दाखल झाले.

कराड याने शरण येण्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. तो येणार असल्याची पूर्वकल्पना असल्याने सकाळपासूनच मुख्यालयाबाहेर कडक पोलिस बंदोबस्त होता. शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे व परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीप गिल यांनी सुरक्षेचा आढावा घेतला. दुपारी बारा वाजता त्याची खासगी कार सीआयडी मुख्यालयाच्या दुसऱ्या गेटमधून आत आली. 

कराडसोबत होते दोघेजण -वाल्मीक कराड चेहरा लपवून आत जाण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्यासमवेत एक परळीचा नगरसेवक व दुसरा निकटवर्तीय होता. पत्रकारांनी दोघांना विचारले की, तुम्ही त्याच्याबरोबर कसे?, तो तुम्हाला कुठे भेटला? निकटवर्तीय म्हणाला, वाल्मीक आम्हाला अक्कलकोट स्वामींच्या मंदिरात भेटला. तिथून आम्ही इकडे आलो. परळीच्या नगरसेवकाने आपण परवापासून कराडसमवेत असल्याचा दावा केला. या वेळी बीड पोलिस देखील हजर होते.

केज पोलिस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड स्वतःहून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पुणे येथील मुख्यालयात हजर झाला. या गुन्ह्याचा तपास सीआयडीच्या बीड विभागाचे उपअधीक्षक अनिल गुजर करीत आहेत. सीआयडीचे पथक कराडला घेऊन बीडला रवाना झाले आहे.    - सारंग आव्हाड, उपमहानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) पुणे 

टॅग्स :BeedबीडBJPभाजपाPoliceपोलिस