पुणे: कोणताही राजकीय नेता, नट किंवा शास्त्रज्ञ आपल्याला सावली देत नाही किंवा फळही देत नाही. त्यामुळे माझ्या मते, झाड हा खरा सेलिब्रिटी असून, त्याच्यावर प्रेम करायला हवं. झाडं आहेत, म्हणून आपण आहोत. आपल्याला आई जन्म देते, पण नंतर ऑक्सिजन देऊन झाडच आपल्याला जगवते.
झाड आपल्याला मरेपर्यंत ऑक्सिजन देते. त्यामुळे आई आणि झाड यापेक्षा मोठं काहीच नाही. त्यासाठी झाडं वाचवणे आवश्यक आहे. त्यांच्यावर प्रेम केले तरच आपण त्यांच्यावर कुऱ्हाड चालवणार नाही. झाडांच्या प्रेमापोटीच मी २०२० पासून वृक्षसंमेलन सुरू केले. पहिल्यांदा राज्यामध्ये बीड येथे देवराई साकारून तिथे वृक्षसंमेलन घेतले. या प्रेमापोटीच मी आता राज्यभरात शंभर देवराई साकारणार आहे. त्यासाठी अनेकजण मदतीला आले आहेत.
राज्यात आतापर्यंत ४० देवराई साकार झाल्या आहेत. देवराई म्हणजे आपली दुसरी आईच असते. कारण तिथेच आपल्याला प्रेम, माया, जिव्हाळा मिळतो. कडक उन्हामध्ये माउली रूपाची सावली झाडच देते. इतर कोणीही आपल्याला अशी सावली देत नाही. झाडं वाचली तरच आपण वाचू. कारण झाडांमुळेच आपण जीवंत आहोत. आई आपल्याला जन्म देत असते, त्यामुळे तिच्यावर तर प्रेम केलेच पाहिजे, पण जन्मानंतर आपला श्वास हा झाडांच्या ऑक्सिजनवर सुरू असतो. त्यामुळे आई आणि झाड या दोन माउलींवर भरपूर प्रेम करा. झाड आपल्याला फूल देते, फळ देते, पान देते, सावली देते. एवढं सगळं ते आपल्याला फुकटात देत असते. त्यामुळे तिची काळजी आपणच घेतली पाहिजे.
झाडांवरील प्रेम वाढावे म्हणून आम्ही रॅप गीतदेखील बनवले. त्यानंतर अरविंद जगताप यांनी एक सुंदर कविता केली आहे. तीदेखील आम्ही गात असतो.
मुळांचे कुळ घेऊ, खोडांचे बळ होऊझाडाचे गुण घेऊ, झाडाचे गुण गाऊ,गोष्टी आहेत पानोपानी, सांगू आम्ही कानोकानीफुलांच्या खाणाखुणा, पेरू आम्ही रानीवनी...,कधी होऊ पारंबी, कधी होऊ फांदीहिरव्यागार जगाची, होऊ आम्ही नांदी ..खास आम्ही होऊ श्वास आम्ही होऊमुळांचे कुळ घेऊ खोडांचे बळ होऊझाडाचे गुण घेऊ झाडाचे गुण गाऊ !अशी ती कविता आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये ही गोष्ट पटकन जाते. आज हवामान बदल होत आहे. त्यामुळे झाडांवर प्रेम करून त्यांना वाचविणे अत्यंत गरजेचे बनले आहे. झाडं वाचवूया, झाडं जगवूया, त्यांच्यावर प्रेम करूया!
Web Summary : Sayaji Shinde emphasizes loving trees alongside mothers, highlighting their life-giving oxygen. He advocates for tree conservation through initiatives like 'Devrai,' aiming to establish 100 such havens, urging everyone to cherish trees for a sustainable future.
Web Summary : सयाजी शिंदे माँ के साथ पेड़ों से प्यार करने पर जोर देते हैं, उनके जीवनदायी ऑक्सीजन पर प्रकाश डालते हैं। वे 'देवराई' जैसी पहलों के माध्यम से पेड़ संरक्षण की वकालत करते हैं, जिसका लक्ष्य 100 ऐसे आश्रय स्थापित करना है, और सभी से स्थायी भविष्य के लिए पेड़ों को संजोने का आग्रह करते हैं।