शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नामकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाजपेयी-ठाकरे आमनेसामने.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 14:57 IST

विशेष म्हणजे अजून कर्वे रस्त्यावरील पहिल्या दुहेरी उड्डाणपुलाचे कामच सुरू झालेले नाही. त्यापुर्वीच त्याच्या नामकरणाचा वाद सुरू झाला आहे..

ठळक मुद्देमहापालिकेच्या अंदाजपत्रकात ३५ कोटी रूपयांची तरतुद महामेट्रो कंपनी त्यात २५ कोटी रूपये खर्च करणारमेट्रोच्या खांबांलाच हा पूल जोडण्यात येणार असून अशा प्रकारचा हा पहिलाच पूल असणार

पुणे : महामेट्रो व महापालिका संयुक्तपणे करणार असलेल्या कर्वे रस्त्यावरील पहिल्या दुहेरी उड्डाणपुलाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीने केली आहे. त्याला हरकत घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या पुलाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघाला समोर ठेवून या मागण्या करण्यात येत असल्या तरी त्याचा अंतिम निर्णय महापालिकेतच होणार आहे. विशेष म्हणजे अजून या पुलाचे कामच सुरू झालेले नाही. त्यापुर्वीच त्याच्या नामकरणाचा वाद सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवड्यापुर्वीच त्याचे भूमिपूजन केले. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी त्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात ३५ कोटी रूपयांची तरतुद केली आहे. महामेट्रो कंपनी त्यात २५ कोटी रूपये खर्च करणार आहे. मेट्रोच्या खांबांलाच हा पूल जोडण्यात येणार असून अशा प्रकारचा हा पहिलाच पूल असणार आहे. त्याला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव द्यावे असा प्रस्ताव मोहोळ यांनी महापालिकेत दिला असल्याची चर्चा आहे. मोहोळ या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असून त्यासाठीच त्यांची ही मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मोहोळ यांच्याबरोबरच मनसेलाही कोथरूड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यासाठीच त्यांनी या पुलाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे. कोथरूड हे पुणे शहरातील विकसित झालेले पहिले उपनगर आहे. ते विकसित होण्यात बाळासाहेब ठाकरेंचे अमूल्य योगदान आहे. त्यामुळे या उड्डाणपूलाचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल असे नामकरण करण्यात यावे. वाजपेयी यांचे नाव द्यायचेच असेल तर ते  चांदणी चौकातील प्रस्तावित उड्डाणपूलाला द्यावे अशी मागणी मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस व महापालिकेतील माजी गटनेते किशोर शिंदे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.  

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMetroमेट्रोAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे