तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 16:34 IST2025-06-01T16:32:37+5:302025-06-01T16:34:11+5:30

- पोलिसांनी पासपोर्ट आणि शस्त्र परवानाही केला जप्त 

Vaishnavi Hagawane Death Case Who was he in contact with, what did he chat about? Nepal SIM card found with Nilesh Chavan | तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 

तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 

पिंपरी :वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात शनिवारी पोलिस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या बावधन पोलिसांनी नीलेश चव्हाणला त्याच्या पुण्यातील कर्वेनगर येथील घरी नेऊन तपास केला. तेथून तीन मोबाइल फोन, शस्त्र परवाना, पिस्तूल, पासपोर्ट जप्त करण्यात आले.

नीलेशची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. शनिवारी त्याला त्याच्या घरी नेण्यात आले. वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा हगवणे या तिघांचे मोबाइल फोन नीलेशच्या घरात मिळून आले. ते पोलिसांनी जप्त केले. घरातून नीलेशचे पारपत्र (पासपोर्ट), शस्त्र परवाना आणि पिस्तूलही जप्त करण्यात आले.

नेपाळचे सीमकार्ड

नीलेश चव्हाणला अटक केली, त्यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी तीन मोबाइल जप्त केले होते. ते तोच वापरत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या मोबाइलवरून तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले, याचा तपास करण्यात येणार आहे. त्याने नेपाळचे सीमकार्ड घेऊन नेपाळी मोबाइल क्रमांक घेतल्याचेही समोर येत आहे.

 नीलेश चव्हाणकडून यापूर्वी तीन मोबाइल जप्त केले आहेत. शनिवारी त्याच्या घरातून तीन मोबाइल फोन जप्त केले. जप्त केलेले मोबाइल न्यायवैद्यक (फाॅरेन्सिक लॅब) विभागाकडे पाठविण्यात येणार आहेत. - अनिल विभुते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बावधन

Web Title: Vaishnavi Hagawane Death Case Who was he in contact with, what did he chat about? Nepal SIM card found with Nilesh Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.