जेसीबी फसवणूक प्रकरण: शशांक, लता हगवणेसह 4 जणांना न्यायालयीन कोठडी; खेड कोर्टाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 14:30 IST2025-06-07T14:29:46+5:302025-06-07T14:30:09+5:30
शशांक आणि लता हगवणे यांच्या इतर चार जणांची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज (दि.७) ला खेड न्यायालयात हजर करण्यात आले होते,सर्वांची एकत्रित सुनावणी झाली.

जेसीबी फसवणूक प्रकरण: शशांक, लता हगवणेसह 4 जणांना न्यायालयीन कोठडी; खेड कोर्टाचा निर्णय
चाकण : जेसीबी गैरव्यवहार प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात शशांक हगवणे व लता हगवणे या माय लेकासह तीन तोतया बँक वसुली एजंटांसह जेसीबी शशांक हगवणे याच्या ताब्यात देणाऱ्या प्रणय साठे अश्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या सर्वांना आज (दि.७)ला राजगुरूनगर न्यायालयात हजर करण्यात आले.या सर्वांना न्यायलीयन कोठडी सुनावण्यात आली आहे.
जेसीबी फसवणूक प्रकरणात प्रशांत येळवंडे यांनी महाळुंगे एमआयडीसी (ता.खेड) पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून शशांक आणि लता हगवणे या माय लेकासह योगेश राजेंद्र रासकर,गणेश रमेश पोतले,वैभव मोहन पिंगळे ह्या तीन तोतया बँक अधिकाऱ्यांसह मांडवली करणारा प्रणव साठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शशांक आणि लता हगवणे यांच्या इतर चार जणांची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज (दि.७) ला खेड न्यायालयात हजर करण्यात आले होते,सर्वांची एकत्रित सुनावणी झाली. यावेळी तपासी अधिकाऱ्यांनी तीन दिवसाची वाढीव पोलिस कोठडीची मागणी केली होती,मात्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेऊन न्यायालयाने न्यायायलीन कोठडी सुनावली आहे.त्यामुळे हगवणे माय लेकांसह इतर चार जणांची येरवडा कारागृहात रवानगी होणार आहे. आता शशांक आणि लता हगवणे यांच्या जामिनासाठी प्रकिया सुरू केली असल्याची माहिती आरोपींचे वकिलांनी सांगितले.