Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 20:32 IST2025-05-23T20:31:56+5:302025-05-23T20:32:39+5:30

राजेंद्र हगवणे आमच्या पक्षात नाही, आरोपींना सोडणार नाही

Vaishnavi Hagawane Death Case Ajit Pawar spoke clearly after meeting the Kaspate family | Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'

Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, आरोपी राजेंद्र हगवणे याला पक्षाचा कोणताही पाठिंबा नाही. अत्यंत वेदनादायक घटना आहे, दोषींना सोडणार नाही, असा ठाम शब्द अजित पवार यांनी दिला आहे.

वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) यांनी १६ मे रोजी आत्महत्या केल्याची घटना भुकूम येथे घडली. या प्रकरणात सासरच्या लोकांवर गंभीर आरोप झाले असून, वैष्णवीच्या सासऱ्याला अटक झाल्यानंतर राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. आज अजित पवार यांनी स्वत: वैष्णवीच्या आईवडिलांची भेट घेऊन त्यांना सांत्वन केले.



अजित पवार म्हणाले, घटना घडल्यानंतर मी पोलिस आयुक्तांना त्वरित आदेश दिले की, संबंधित आरोपींना पकडले पाहिजे. सासरे आणि दीर फरार होते, पण आता पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. यामध्ये आणखी एका चव्हाण नावाच्या व्यक्तीचा सहभाग असल्याचे समोर आले असून, त्यालाही लवकरच पकडण्याचे निर्देश दिले आहेत.

पुढे ते म्हणाले, वैष्णवीच्या जावेला (भावजय) पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असता तिने सर्व गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या आहेत. कुटुंबीयांनी पोलिसांना सहकार्य केल्याने ही केस अधिक बळकट होत आहे. कुटुंबीयांनी मन मोकळा करून मला सर्व सांगितले आहे. आम्ही ही केस फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्री दिल्लीत जात आहेत, विमान प्रवासात त्यांच्याशी या प्रकरणावर चर्चा करणार आहे. अजित पवार यांनी नव्या सूनांवर होणाऱ्या सासरच्या छळाबाबतही मत व्यक्त केले. आज कायदे बदलले आहेत. सासरच्या लोकांनी छळ केल्यास त्यावर कठोर कारवाई होते. वैष्णवीसारख्या अनेक महिलांना न्याय मिळावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात अजित पवारांच्या सक्रिय सहभागामुळे तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे, तर पीडित कुटुंबासाठी हा एक दिलासा मानला जात आहे.

Web Title: Vaishnavi Hagawane Death Case Ajit Pawar spoke clearly after meeting the Kaspate family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.