वहिनी आंघोळ करतानाचा दिराने काढला व्हिडिओ; दिराला अटक, खेड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 17:59 IST2025-02-27T17:58:57+5:302025-02-27T17:59:43+5:30

चाकण पोलिसांनी संबंधित आरोपीस ताब्यात घेऊन विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे

vahainai-anghaola-karataanaacaa-dairaanae-kaadhalaa-vahaidaio-dairaalaa-ataka-khaeda-taalaukayaataila-ghatanaa | वहिनी आंघोळ करतानाचा दिराने काढला व्हिडिओ; दिराला अटक, खेड तालुक्यातील घटना

वहिनी आंघोळ करतानाचा दिराने काढला व्हिडिओ; दिराला अटक, खेड तालुक्यातील घटना

शेलपिंपळगाव : चुलत वहिनी बाथरूममध्ये अंघोळ करत असताना दिराने वहिनीचा आंघोळ करत असताना व्हिडिओ शूटिंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

चाकणपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. २६) सकाळी शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे ही घटना घडली आहे. चुलत वहिनी बाथरूममध्ये अंघोळ करत असताना आरोपीने आंघोळ करत असतानाचा व्हिडिओ शूट केला. दरम्यान चाकण पोलिसांनी संबंधित आरोपीस ताब्यात घेऊन विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस गुरुवारी (दि. २७) न्यायालयात हजर करण्यात आले आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Web Title: vahainai-anghaola-karataanaacaa-dairaanae-kaadhalaa-vahaidaio-dairaalaa-ataka-khaeda-taalaukayaataila-ghatanaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.