शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

लोणी काळभोरमध्ये दोन दिवसांपासून लसींचा तुटवडा, आज लसीकरण पूर्णपणे थांबले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 5:29 PM

लस उपलब्ध नसल्याने नागरिक परतले घरी

ठळक मुद्देशासनाने लवकरात लवकर लस उपलब्ध करून द्यावी अशी नागरिकांची मागणी

राज्यात लसींचा मुबलक साठा उपलब्ध नसल्याने अनेक जिल्ह्यात लसीकरण थांबल्याचे चित्र समोर आले आहे. त्यातच पूर्व हवेलीतील लोणी काळभोरसह कुंजीरवाडी, व उरुळी कांचन सारख्या लोकसंख्येने मोठ्या असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक आरोग्य केेंद्रात लस उपलब्ध नसल्याने लसीकरण पूर्णपणे थांबले आहे. नागरिकांना नाईलाजाने गुरुवार व शुक्रवारी घरी परतावे लागले आहे. 

सुरुवातीला या लसीकरणाला लोकांचा प्रतिसाद मिळत नव्हता. परंतू आरोग्य विभागाने केलेल्या जनजागृतीमुळे नागरिकांमधील याबाबत असलेली भीती नष्ट झाल्याने त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. परंतू गेले दोन दिवसांपासून लस उपलब्ध होत नसल्याने त्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. तालुक्यात कुठेच लस उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे साहजिकच लस घेण्यासाठी दूरवरून येणाऱ्या लोकांना पुन्हा आपल्या घरचा रस्ता धरावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कालपर्यंत तालुक्यातील बहुतांश लसीकरण केंद्रांवरची लस संपली असल्याने तसेच अद्याप जिल्हा पातळीवरून लस उपलब्ध झाली नसल्याने नाईलाजाने लसीकरण थांबवावे लागले आहे. 

पुर्व हवेेेलीत सध्या कोरोना रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे. आकडेवारीवरून ही गावे हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना लवकरात लवकर लस उपलब्ध होऊन त्याचा लाभ मिळावा अशी आग्रही मागणी नागरिकांमधून होत आहे. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून ४५  वर्षांवरील सहव्याधी तसेच अन्य व्यक्तींना लसीकरण करण्यात येत आहे. या ठिकाणी फ्रंटलाईन वर्कर तसेच आरोग्य कर्मचारी यांना लसीकरण करण्यात आले आहे. राज्य सरकारने ४५ वर्ष वयोगटावरील सर्वांनाच लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या होत्या. परंतू आठच दिवसात लस संपल्याने नागरिकांत तीव्र नाराजी दिसून येत आहे. आजअखेर लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रात ६ हजार १६५ जणांना, उरूळी कांचन प्राथमिक आरोग्य केेंद्रात ३ हजार ८३५ जनांना तर कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केेंद्रात ३ हजार ५७० जनांना लस देण्यात आली आहे. परंतू लोकसंख्येचा विचार करता पूर्व हवेलीत मोठ्या प्रमाणात लसीची गरज आहे. 

तालुका आरोग्य अधिकारी डॉ सचिन खरात म्हणाले, आतापर्यंत हवेली तालुक्यात ६४ हजार १२३ जणांना लस देण्यात आली आहे. सद्यस्थितीत शासनाकडून लस उपलब्ध न झाल्याने लसीकरण थांबले आहे. ही बाब सत्य असली तरी येत्या दोन दिवसांत लसी उपलब्ध होणार आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याने लस उपलब्ध होताच लसीकरण कार्यक्रमाला पुन्हा सुरूवात करण्यात येईल.

टॅग्स :PuneपुणेLoni Kalbhorलोणी काळभोरCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या