शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

बाह्यवळण रस्त्यासाठी टीडीआरचा वापर

By admin | Updated: November 4, 2015 04:11 IST

भूसंपादनाअभावी तब्बल ३० वर्षे रेंगाळलेल्या बाह्यवळण रस्त्यासाठी (हाय कपॅसिटी मास ट्रान्सपोर्ट रूट-एचसीएमटीआर) डेव्हलपमेंट टीडीआर (ट्रान्सफर आॅफ डेव्हलपमेंट राईट)

पुणे : भूसंपादनाअभावी तब्बल ३० वर्षे रेंगाळलेल्या बाह्यवळण रस्त्यासाठी (हाय कपॅसिटी मास ट्रान्सपोर्ट रूट-एचसीएमटीआर) डेव्हलपमेंट टीडीआर (ट्रान्सफर आॅफ डेव्हलपमेंट राईट) राबविण्यास स्थायी समितीने आज मंजुरी दिली. समितीमधील भारतीय जनता पक्षाच्या ३ सदस्यांनी या विषयाला विरोध केला, त्यामुळे मतदान होऊन ३ विरुद्ध १० मतांनी हा विषय मंजूर झाला. ३ सदस्य अनुपस्थित होते.स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांनी ही माहिती दिली. शहराच्या मध्यभागावरील वाहतुकीचा ताण फार मोठ्या प्रमाणात कमी करणारा हा एचसीएमटीआर रस्ता गेली तब्बल ३० वर्षे रेंगाळला आहे. त्याची लांबी एकूण ३४ किलोमीटर आहे. त्यासाठी काही सरकारी, तर काही खासगी जागा संपादन करणे गरजेचे होते. त्याची रक्कम एकूण १५०० कोटी रुपये होत होती. जागा मालकाला त्याच्या बदल्यात टीडीआर द्यावा लागतो. राज्य सरकारचाही याला काही आक्षेप असणार नाही. त्यामुळे हा विषय मंजूर करावा, असे उपमहापौर बागुल यांनी प्रस्तावात म्हटले होते.समितीत हा विषय चर्चेला आल्यानंतर भाजपाच्या मुक्ता टिळक, राजेंद्र शिळीमकर व श्रीकांत जगताप या सदस्यांनी विरोध केला. हा विषय तातडीचा नाही, त्यामुळे तो पुढच्या सभेत घ्यावा, असे त्यांचे म्हणणे होते; मात्र काँग्रेसचे अविनाश बागवे यांनी या कामाची गरज सविस्तरपणे विषद केली. (प्रतिनिधी)