केवायसी अपडेट करतो; महिलेला पावणेचार लाखांना गंडवले, धायरी परिसरातली घटना
By भाग्यश्री गिलडा | Updated: February 28, 2024 17:04 IST2024-02-28T17:04:08+5:302024-02-28T17:04:25+5:30
बँकेचे कर्मचारी असल्याचे सांगून तुमचे केवायसी अपडेट करायचा आहे, असे सांगून महिलेला फोन आला होता

केवायसी अपडेट करतो; महिलेला पावणेचार लाखांना गंडवले, धायरी परिसरातली घटना
पुणे : बँकेचा कर्मचारी बोलत असल्याचे सांगून केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने महिलेला गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत धायरी परिसरात राहणाऱ्या ४२ ववर्षीय महिलेने सिंहगडरोड पोलिसांना फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार फिर्यादींना २६ जुलै २०२३ रोजी अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला. ऍक्सिस बँकेचे कर्मचारी असल्याचे सांगून तुमचे केवायसी अपडेट करायचा आहे, आजची शेवटची तारीख आहे असे सांगितले. त्यानंतर पण कार्ड अपडेट करण्यासाठी महिलेला एक लिंक पाठवली. लिंक ओपन करून त्यात खासगी माहिती भरली. या माहितीचा वापर करून फिर्यादी महिलेच्या खात्यातून परस्पर ३ लाख ७५ हजार रुपये काढून घेतले. त्यांनतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. याबाबत सिंहगरोड पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमभर करत आहेत.