Unseasonal rains : पावसाळी लाइनच नाहीत, शहरात केवळ १६ टक्के प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 10:15 IST2026-04-04T10:14:39+5:302026-04-04T10:15:49+5:30

Unseasonal rains पाऊस पडल्यानंतर पाणी वाहून जाण्यासाठी पावसाळी लाइन नसल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे.

Unseasonal rains There are no rain lines, only 16 percent in the city | Unseasonal rains : पावसाळी लाइनच नाहीत, शहरात केवळ १६ टक्के प्रमाण

Unseasonal rains : पावसाळी लाइनच नाहीत, शहरात केवळ १६ टक्के प्रमाण

पुणे :पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावामध्ये रस्त्यांचे जाळे पुरेशा प्रमाणात नाही. त्याचबरोबर, या रस्त्याच्या कडेला पावसाळी लाइन नाहीत. त्याचबरोबर, शहराच्या जुन्या हद्दीमध्ये पावसाळी लाइनचे प्रमाण केवळ १६ टक्के आहे. पाऊस पडल्यानंतर पाणी वाहून जाण्यासाठी पावसाळी लाइन नसल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे.

पुणे महापालिकेत गेल्या काही वर्षांत ३२ गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे पुणे महापालिका भौगोलिक क्षेत्रफळाने राज्यातील सर्वांत मोठी महापालिका झाली आहे. पुणे शहराच्या जुन्या हद्दीत पावसाळी लाइन टाकण्यात आलेल्या आहेत, पण त्याही ठरावीक भागात आहे. २४ मीटरच्या रस्त्यावरच पावसाळी लाइन आहेत, पण त्यापेक्षा कमी रस्ता रुंदीच्या रस्त्यावर पावसाळी लाइन नाहीत. रस्त्याला उतार असले, तर पावसाळी लाइनची गरज नाही, पण रस्ते खोलगट आणि समपातळीवर असेल, तर पावसाळी लाइनची आवश्यकता आहे. शहराच्या जुन्या हद्दीमध्ये पावसाळी लाइनचे प्रमाण केवळ १६ टक्के आहे

जुन्या हद्दीतील पावसाळी लाइनच्या डीपीआर केला नाही

शहराच्या जुन्या हद्दीतील पावसाळी लाइन टाकण्यासाठी आतापर्यंत सर्वकष आराखडा (डीपीआर) तयार केला नाही. पालिकेत समाविष्ट झालेल्या ११ आणि २३ गावांसाठी पावसाळी लाइन टाकण्यासाठी डीपीआर तयार केला आहे.

रस्त्याचे प्रमाण अवघे ९ ते १० टक्के

पुणे शहराचे भौगोलिक क्षेत्रफळ पाहता, रस्त्याचे प्रमाण ९ ते १० टक्के आहे. रस्त्याचे प्रमाण १५ टक्के असे अपेक्षित आहे, पण ते अत्यंत कमी आहे. समाविष्ट गावामध्ये रस्त्याचे जाळे अद्यापही तयार झालेले नाही. त्यामुळे या गावामध्ये रस्ते कधी तयार होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Web Title : पुणे में जलभराव: शहर में केवल 16% तूफानी जल निकासी लाइनें।

Web Summary : अपर्याप्त तूफानी जल निकासी के कारण पुणे जलभराव से जूझ रहा है। पुराने शहर का केवल 16% हिस्सा ही इससे जुड़ा है, और नए जोड़े गए गाँवों में उचित सड़क नेटवर्क और जल निकासी का अभाव है। सड़क कवरेज भी अपेक्षित 15% से काफी कम है।

Web Title : Pune faces waterlogging: Only 16% stormwater drains in city.

Web Summary : Pune struggles with waterlogging due to inadequate stormwater drains. Only 16% of the old city has them, and newly added villages lack proper road networks and drainage. Road coverage is also significantly below the expected 15%.