शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Unseasonal rains : अवकाळी पावसाचा तडाखा; कांदा-गहू पिकांचे मोठे नुकसान; पंचनाम्याची शेतकऱ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 15:56 IST

- आधीच कांद्याचे बाजारभाव घसरले असताना पावसामुळे दुहेरी संकट ओढवल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

रांजणगाव सांडस : रांजणगाव सांडस तसेच आलेगाव पागा, राक्षेवाडी व परिसरातील गावांमध्ये अवकाळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली.

कांदा काढून शेतात वाळवण्यासाठी ठेवलेला असताना पावसाची सर आल्याने कांदा उत्पादक शेतकरी प्लास्टिकच्या आच्छादनासाठी धावपळ करत होते. मात्र, अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांदा भिजला. आधीच कांद्याचे बाजारभाव घसरले असताना पावसामुळे दुहेरी संकट ओढवल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

सध्या परिसरात गहू काढणीचे काम सुरू असताना जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी गव्हाची पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, अवकाळी पावसाचा फटका वीटभट्टी व्यवसायालाही बसला आहे. पावसामुळे कच्च्या विटा भिजल्याने वीटभट्टी चालकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. यापूर्वी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे झाले असले तरी काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप मदतीची रक्कम जमा झालेली नाही. त्यातच पुन्हा अवकाळी पावसामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडल्याचे चित्र आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Unseasonal Rains Lash Maharashtra: Onion, Wheat Crops Damaged, Farmers Demand Assessment

Web Summary : Unseasonal rains and strong winds caused significant damage to onion and wheat crops in Ranjangaon Sandas and surrounding villages. Farmers are demanding immediate government assessment and compensation for their losses, exacerbated by previous unmet aid promises.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊसPuneपुणेweatherहवामान अंदाज