शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

मनोरुग्णांनी दिला अनोखा संदेश

By admin | Updated: September 12, 2016 02:30 IST

भावना सांभाळा मनोविकार टाळा’ असा संदेश देत मनोरुग्ण सादरीकरणात रमले. पथनाट्य आणि गाणी सादर करत ‘काही बोलायचे आहे

पुणे : ‘भावना सांभाळा मनोविकार टाळा’ असा संदेश देत मनोरुग्ण सादरीकरणात रमले. पथनाट्य आणि गाणी सादर करत ‘काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही’, असे मानसिक आजारांसाठी उपचार घेणाऱ्या मनोरुग्णांनी सांगितले. निमित्त होते, परिवर्तन संस्थेने रविवारी आयोजिलेल्या मानसरंग कार्यक्रमाचे.मानिसक आजारांविषयी समाजप्रबोधन करण्यासाठी मानसरंग नावाच्या नाट्य व्यासपीठाची निर्मिती परिवर्तन संस्थेने केली आहे. तसेच मानसिक आरोग्याविषयी प्रबोधन करण्यासाठी पोस्टरची निर्मितीही ज्येष्ठ कलावंत अतुल पेठे यांच्या संकल्पनेतून केलेली आहे. या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन सुदर्शन रंगमंच येथे जागतिक मानसोपचार तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्ष प्रा. हेलन हर्मन यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रसिद्ध अभिनेते, मनोविकारतज्ज्ञ मोहन आगाशे, नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे, चित्रकार जयंत जोशी, कुमार गोखले, परिवर्तन संस्थेच्या शमिका बापट, डॉ. हमीद दाभोलकर उपस्थित होते. हे प्रदर्शन सोमवारीही खुले आहे. अंधारातून प्रकाशाकडे या पथनाट्यातून मनोविकार झालेल्या रुग्णांनी वैद्यकीय उपचार घेऊन व्यवस्थित व्हावे, असा संदेश दिला. मनोविकार झालेला एक नागरिक रस्त्यावर फिरत गाणी म्हणत असतो. त्याला सिगारेटचे व्यसन असते. तसेच तो देव-देवही करत असतो, पण तो आजारातून बरा होत नाही. शेवटी त्याच्यावर वैद्यकीय उपचार केल्याने तो बरा होतो, असा संदेश मनोरुग्ण कलाकारांनी दिला. (प्रतिनिधी)