शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

पुणेकर मशिदीच्या भेटीला, आझम कॅम्पसमध्ये आगळा वेगळा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 1:35 AM

आझम कॅम्पसमध्ये आगळा वेगळा उपक्रम : तीनशेहून अधिक नागरिकांनी जाणून घेतले मशिदीचे अंतरंग

पुणे : रविवारचा दिवस पुणेकरांसाठी आनंदाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरला. कारण तीनशेहून अधिक नागरिकांनी मशिदीत जाऊन तिचे अंतरंग जाणून घेतले. पुण्यातील इस्लामिक रीसर्च सेंटरकडून हा उपक्रम झाला. या संस्थेतर्फे ‘व्हिजिट अवर मॉस्क’ हा दोन दिवसीय आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमात सर्व वयोगटातील पुरुष आणि महिलांना मशिदीची संपूर्ण माहिती थेट मशिदीत जाऊन देण्यात आली. भेट दिलेल्या नागरिकांना यावेळी इस्लाम धर्म, त्याची शिकवण, त्याचे महत्त्व सांगण्यात आले. नागरिकांनीदेखील मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभागी होऊन या सर्व गोष्टी समजावून घेतल्या. तसेच हा उपक्रम सामाजिक सलोख्यासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या.

पुण्यातील कॅम्प भागातील आझम कॅम्पस मशिदीमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात इस्लामच्या प्रारंभापासून ते आजपर्यंत चालत आलेल्या परंपरेची माहिती लोकांना देण्यात आली. वजू म्हणजे काय? नमाज म्हणजे काय? अजान म्हणजे काय? काबा कशाला म्हणतात यासारख्या इस्लाममधील प्रचलित बाबी लोकांना समजावून सांगत त्यांच्या विविध प्रश्नांचे निरसन करण्यात आले. विशेष म्हणजे महिलांनाही मशिदीत खुला प्रवेश देण्यात आला. अनेकांनी कुराणबद्दल माहिती आवर्जुन जाणून घेतली. या उपक्रमात विविध जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते. मुस्लिमधर्मीय प्रार्थनास्थळाविषयी असणारे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. या मशिदीला भेट देणारी अंकिता आपटे म्हणाली, या उपक्रमामुळे इस्लाम धर्माबाबत असलेले गैरसमज आणि चुकीच्या संकल्पना दूर होण्यास मदत झाली. यातून नवीन माहिती मिळाली.मशिदीबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज...या उपक्रमाबाबत बोलताना इस्लामिक रीसर्च सेंटरचे अध्यक्ष करीमुद्दीन शेख म्हणाले, लोकांनी मशिद आतून कशी असते, हे कधी पाहिले नव्हते. मशिदीमध्ये नेमके काय असते याबाबत नागरिकांमध्येकुतुहूल होते. त्याचबरोबर अनेकांच्या मनात मशिदीबद्दल अनेक गैरसमज देखील आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मशिदीबाबतची सर्व माहिती जाणून घेतली. तसेच मशिदीबाबतच्या त्यांच्या सर्व शंका दूर करण्यात आल्या. पुण्यात हा उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात आला होता. यापुढेही असा उपक्रम राबविण्याचा आमचा विचार आहे.

टॅग्स :Puneपुणे