ट्रॅक्टर-दुचाकीच्या अपघातात आईने गमावले ६ महिन्यांचे बाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 19:51 IST2022-09-22T19:49:59+5:302022-09-22T19:51:05+5:30
शहरातील वाडा रोडवरील घटना...

ट्रॅक्टर-दुचाकीच्या अपघातात आईने गमावले ६ महिन्यांचे बाळ
- राजेंद्र मांजरे
राजगुरूनगर (पुणे) : टॅक्टरचा दुचाकीला धक्का लागल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील आईच्या हातातील ६ महिन्यांचे बाळ रस्त्यावर पडून जागीच मुत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना आज (दि. २२) शहरातील वाडा रोडवर घडली. या घटनेबाबत कैलास चिंतामण आढळ (रा. राक्षेवाडी ता. खेड ) यांनी खेडपोलिस ठाण्यात माहिती दिली आहे.
या घटनेबाबत खेड पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची पत्नी हे त्याच्या ६ महिन्यांच्या मुलीला आजारी असल्यामुळे दुचाकीवर वाडा रोडने दवाखान्यात घेऊन जात होते. वाड़ारोड येथे संगम कापड दुकानाच्या लगत पाठीमागून खेड एस.टी.स्डॅन्ड बाजुकडून वाडा बाजुकडे जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने मोटार सायकलला ओव्हरटेक केले. ओव्हरटेक करीत असताना ट्रॉलीचा धक्का मोटार सायकलला लागून दुचाकी घसरली. दरम्यान दुचाकीवर मागे बसलेल्या आईच्या मांडीवरील सहा महिन्यांचे बाळ रस्त्यावर पडून जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार संतोष घोलप करित आहे. वाडारोडला शनि मंदिर ते पंचायत समिती चौक या ठिकाणी नेहमी वाहनाची वर्दळ असते. या रस्त्यावर लगत कापड दुकाने असल्यामुळे अनेक दुचाकी दुकानासमोर रस्त्यावर उभ्या केल्या जात असल्यामुळे नेहमी अपघात होत असतात. असे नागरिकांनी सांगितले.