शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाबद्दल अनिश्चितता; महोत्सव पुढे ढकलणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 4:06 AM

पुणे : डिसेंबर महिना उजाडला की ‘कानसेनां’ना वेध लागतात ते देशविदेशातील रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘सवाई गंधर्व भीमसेन’ महोत्सवाचे. भारतीय ...

पुणे : डिसेंबर महिना उजाडला की ‘कानसेनां’ना वेध लागतात ते देशविदेशातील रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘सवाई गंधर्व भीमसेन’ महोत्सवाचे. भारतीय अभिजात संगीत विश्वात या महोत्सवाने एक मानदंड प्रस्थापित केला आहे. यंदा महोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी शासनाने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी प्रवेश मर्यादा निश्चित केली आहे. परंतु दरवर्षी महोत्सवाला येणाऱ्या दर्दी रसिकांची संख्या पाहाता यंदाच्या महोत्सव आयोजनाबाबत अनिश्चितता आहे.

मोठे कार्यक्रम करण्यास सरकारने परवानगी द्यावी, अशी प्रतिक्षा आयोजकांना आहे. ती न मिळाल्यास यंदाचा महोत्सव पुढे ढकलण्याचे संकेत आयोजकांनी दिले आहेत.

दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने ‘सवाई गंधर्व भीमसेन’ संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. सूर, लय, ताल अशा त्रिवेणी संगमातून साकारणाऱ्या या महोत्सवात नव्या-जुन्या पिढीतील दिग्गज कलावंतांचे अविष्कार रसिकांना अनुभवण्यास मिळतात. त्यामुळे या महोत्सवाची रसिक आतुरतेने वाट पाहात असतात.

शासनाने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिल्यानंतर या महोत्सवाबाबतच्या रसिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यंदा महोत्सव होणार का, तो ऑनलाइन होणार, अशी विचारणा रसिकांकडून सुरु झाली. आयोजक मात्र द्विधा अवस्थेत आहेत. महोत्सवाबाबत अद्याप तरी आयोजकांनी कोणतीच ठोस भूमिका जाहीर केलेली नाही.

चौकट

‘लोकमत’ने आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी महोत्सवाच्या आयोजनाबाबत अनिश्चितता व्यक्त केली. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला देशविदेशासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कानसेन हजेरी लावतात. स्वरमंडपात बसून कलाकारांना ऐकणे ही रसिकांसाठी सुखद अनुभूती असते. ‘ऑनलाइन’मध्ये हा अनुभव शक्य नाही. त्यामुळे महोत्सव ऑनलाइन घेण्याचा विचार नाही. सरकारने परवानगी दिल्यानंतर पुढचा विचार करू, असे जोशी म्हणाले.

-------------------------------------------------