शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत उत्खनन पाडले बंद

By admin | Updated: March 4, 2015 22:40 IST

कोणत्याच परवानग्या ग्रामपंचायतीस सादर न केल्याने सणसवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी अनधिकृत उत्खनन व बांधकाम बंद पाडले.

कोरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर) येथील हर्ष ओगल कंपोन्स प्रा. लि. बांधकामासाठी जमीन सपाटीकरणासाठी गौण खनीज उत्खननासाठी महसूल विभागाच्या संगनमताने परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याने व कारखाना उभारणीच्या कोणत्याच परवानग्या ग्रामपंचायतीस सादर न केल्याने सणसवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी अनधिकृत उत्खनन व बांधकाम बंद पाडले. सणसवाडी येथे गट नं. ८९८/३ , ४ मध्ये हर्ष ओगल कंपोन्स या कारखान्याचे बांधकाम चालू असून, या बांधकामाच्या सपाटीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आले असल्याचे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आले आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीचे सरपंच नवनाथ हरगुडे, तलाठी एस. के. शेख, ग्रामविकास अधिकारी जी. एस. शेलार यांनी याठिकाणी जाऊन काम बंद पाडले. या वेळी याठिकाणी देखरेख करणाऱ्या चौधरी यांच्याकडे कारखान्याकडील उत्खननासाठीचे तहसीलदारांच्या परवान्याची चौकशी केली असता, आज रोजी १२०० ब्रास उत्खननाचे परवाना मिळाले. परंतु याठिकाणी २३ सप्टेंबर २०१४ रोजी कामगार तलाठी अश्विनी कोकाटे यांनी केलेल्या या वेळी ३५२८ ब्रास उत्खनन केल्याचे निष्पन्न झाले असल्याने सर्व ३५२८ ब्रास उत्खनानाचा संयुक्त पंचनामा त्या वेळीही करण्यात आला होता. एवढे होऊनही पुन्हा पाच महिन्यांनंतरही बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याने पाच महिन्यांनंतरही उत्खनन चालू असल्याने १२०० ब्रासच्या परवान्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त उत्खनन केले असल्याने या कारखान्यावर गौन खनिज विभाग कोणती कारवाई करीत नसल्याने महसूल विभागाच्या कारभारावर शंका उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत कंपनीशी संपर्क केला असता, कुठलीच प्रतिक्रिया देण्यास नकार असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)४या जागेवरील बांधकामाच्या शासकीय परवान्यांची मागणी ग्रामपंचायतीने वारंवार कारखान्याकडे केली़ परंतु, तरीही ते उपलब्ध झाले नसल्याची तक्रार सरपंच नवनाथ हरगुडे यांनी तहसीलदार रघुनाथ पोटे यांच्याकडे केली. तसेच, हीच तक्रार घेऊन सोमवारी महसूल विभाग व स्थानिक ग्रामपंचायत यांचा संयुक्त पंचनामा करून ग्रामपंचायतीकडून चालू कामाला नोटीस देऊन बंद केल्याची माहितीही सरपंच नवनाथ हरगुडे यांनी दिली.