थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 11:19 IST2025-10-12T11:12:10+5:302025-10-12T11:19:14+5:30
मृण्मयी देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेला 'मनाचे श्लोक' या मराठी चित्रपटाला पुण्यातील एका थिएटरमध्ये विरोध झाल्याचे पाहायला मिळाले. हिंदू कार्यकर्त्या उज्वला गौड यांनी संत रामदास स्वामी यांच्या संबंधित दृश्ये वादग्रस्त असल्याचे आरोप केले आहेत.

थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित 'मनाचे श्लोक' या मराठी चित्रपटाचा शो काल पुण्यात बंद पाडला होता. पुण्यातील अभिरुची थिएटरमध्ये या चित्रपटाचा शो चालू होता. यावेळी उज्वला गौड यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी हा शो बंद पाडला. गौड या हिंदू संघटनेशी संबंधित आहेत. या चित्रपटाचे नाव रामदास स्वामी यांच्या श्लोकाचे नाव असल्यामुळे तसेच चित्रपटात काही वादग्रस्त प्रसंग दाखवल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, आता हा चित्रपट बंद पाडणे गौड यांना भोवले आहे. त्यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
"मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडल्या प्रकरणी उज्वला गौड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अलंकार पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चित्रपटात समर्थ रामदास स्वामी यांच्या श्लोकाचा अवमान झाल्याचा आरोप आहे. सरकारी कामात अडथळा आणणे आणि त्यासोबत गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'मनाचे श्लोक' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाला विरोध केला होता. दरम्यान, काल या चित्रपटाचा शो अभिरुची थिएटरमध्ये सुरू होता. यावेळी उज्वला गौड यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह जात चित्रपटाचा शो बंद पाडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर या प्रकरणी उलट-सुलट प्रतिक्रिया आल्या आहेत. दरम्यान, आता पोलिसांनी गौड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.