शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना वरदान ठरणारे उजनी धरण भरले १०१ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 11:28 IST

जिल्ह्यातील इंदापूर, बारामतीसह सोलापूर जिल्ह्याचा पाणीप्रश्न मिटणार

ठळक मुद्देमुख्य कालव्यातून सोडले ८०० क्युसेक पाणी : शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

इंदापूर : पुणे, सोलापूर, अहमदनगर या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले उजनी धरण सोमवारी १०१.३३ टक्के भरले आहे. यामुळे जिल्ह्यातील इंदापूर, बारामतीसह सोलापूर जिल्ह्याचा पाणीप्रश्न मिटणार आहे.संपूर्ण वर्षभर वरील तिन्ही जिल्ह्यांतील जवळपास पन्नासपेक्षा अधिक साखर कारखाने, पंधरा औद्योगिक वसाहती, अनेक नगर परिषदा, महानगरपालिका व गावांना या उजनीच्या पाणलोट क्षेत्रातून पाणीपुरवठा करण्यात येतो. धरणाच्या पाण्यावर लाखो शेतकरी कुटुंबे, शेतमजूर आणि उद्योजकांचा प्रपंच अवलंबून आहे.

जिल्ह्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, घोड, विसापूर, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, नीरा देवघर, भाटघर, वीर, नाझरे या धरणांच्या क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने ही धरणे भरली असून, धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे सोमवारी उजनी धरण १०० टक्के भरले. मागील वर्षी ऑगस्ट सुरुवातीला उजनी धरण १०० टक्के भरून विसर्ग चालू होता. यंदा मात्र उजनी शंभर टक्के भरण्यास ऑगस्टअखेर उजाडला आहे. उजनी धरणाची सद्य परिस्थिती

एकूण पाणीपातळी ४९६.९०० मीटर

एकूण पाणीसाठा ३३४३. ६२ दलघमी( एकूण पाण्याचा टीएमसी  ११८.०७ )

उपयुक्त पाणीसाठा १५४०.८१  दलघमी(उपयुक्त पाण्याचा टीएमसी ५४.४१)

एकूण उजनी धरण भरलेली टक्केवारी १०१.५६ टक्के

_______________________________________

उजणीतून सोडलेला विसर्ग

*सिना -  माढा उपसा सिंचन  - २६२ क्युसेक

*भीमा सिना बोगदा  - ९०० क्युसेक

*मुख्य कॅनॉल - ८०० क्युसेक_______________________________________ 

टॅग्स :IndapurइंदापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीRainपाऊसFarmerशेतकरी