पुण्यातील शिवसैनिकाने थेट रक्ताने पोर्ट्रेट काढून उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 12:20 IST2022-07-27T12:10:39+5:302022-07-27T12:20:13+5:30

उद्धव ठाकरे यांचे पोर्ट्रेट स्वतः काढून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या...

Uddhav Thackeray birthday die hard fan removes portrait with live blood Happy birthday | पुण्यातील शिवसैनिकाने थेट रक्ताने पोर्ट्रेट काढून उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

पुण्यातील शिवसैनिकाने थेट रक्ताने पोर्ट्रेट काढून उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

धनकवडी (पुणे) :शिवसेना पक्षप्रमुख मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस असून शिवसेनेतील ऐतिहासिक बंडामुळे झालेल्या दुखाचं आणि राजकीय संकटाचं सावट या वाढदिवसावर आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले होते की, मला भेटवस्तू, पुष्पगुच्छ नको तर प्रतिज्ञा पत्र द्या. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा यंदाचा वाढदिवस महत्त्वाचा असणार असून प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या. परंतु अशीच एक वेगळी संकल्पना राबवत आपल्या लाडक्या नेत्याला थेट स्वतःच्या रक्ताने पोर्ट्रेट काढून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपल्या नेत्याप्रती आपण किती कट्टर आहोत हे इतरांपेक्षा वेगळं करून दाखवून दिलं.

धनकवडी, बालाजीनगर मधील कट्टर शिवसैनिक सारंग धारणे या तरूणाने चक्क स्वतःच्या रक्ताने  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पोर्ट्रेट स्वतः काढून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेच. अशा पद्धतीने शुभेच्छा दिल्यानंतर आज दिवसभरात दक्षिण उपनगरात सारंग धारणे हा शिवसैनिक सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला आहे.

सारंग धारणे हा शिवसेनेचा कट्टर समर्थक म्हणून परिचित आहेत. सारंग धारणेचाही आज वाढदिवस आहे. स्वतः रक्तानं पोर्ट्रेट काढून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी तो मातोश्रीवर गेला आहे.

Web Title: Uddhav Thackeray birthday die hard fan removes portrait with live blood Happy birthday