भाजपकडून उदयनराजे भोसले यांना राज्यसभेची उमेदवारी ; अजून कोणाला लागणार लॉटरी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 22:25 IST2020-03-11T20:39:28+5:302020-03-11T22:25:51+5:30
या महिन्याच्या अखेरीस होत रिक्त होत असलेल्या राज्यसभेच्या जागांच्या उमेदवारांची घोषणा भाजपने केली असून त्यात महाराष्ट्रातल्या जागांचीही घोषणा झाली आहे. अजून एका जागेवरील नाव जाहीर होणे बाकी असल्याने आता कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

भाजपकडून उदयनराजे भोसले यांना राज्यसभेची उमेदवारी ; अजून कोणाला लागणार लॉटरी ?
पुणे : या महिन्याच्या अखेरीस होत रिक्त होत असलेल्या राज्यसभेच्या जागांच्या उमेदवारांची घोषणा भाजपने केली असून त्यात महाराष्ट्रातल्या जागांचीही घोषणा झाली आहे. यामध्ये उदयनराजे भोसले आणि सहयोगी पक्षाचे रामदास आठवले यांचा समावेश आहे. अर्थात अजून एका जागेवरील नाव जाहीर होणे बाकी असल्याने आता कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सहा वर्षांची मुदत असणाऱ्या राज्यसभा खासदार पदासाठी भाजपमध्ये अनेक इच्छुक आहेत. त्यातच महाराष्ट्रात सरकार नसल्यामुळे खासदारकी मिळवण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता कोणाला राज्यसभेची लॉटरी लागणार याकडे राजकीय विश्वाचे लक्ष लागून आहे.
याशिवाय आसाममधून भुवनेश्वर कालीता, बिहारमधून विवेक ठाकूर, गुजरातमधून अभय भारद्वाज, झारखंडमधून दीपक प्रकाश, मध्यप्रदेशमधून ज्योतिरादित्य शिंदे, राजस्थानमधून राजेंद्र गेहलोत आणि मणिपूरमध्ये लिएसिम्बा महाराजा यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.