शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

'असा' प्रामाणिकपणा दुर्मिळच; रिक्षाचालकाने परत केले प्रवाशाचे तब्बल एवढे तोळे सोने

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 12:18 PM

बुधवारी दुपारी खुद्दुस मेहबुब शेख हे पत्नी शहेनाज शेख यांच्यासह मापारे यांच्या रिक्षामध्ये केशवनगर भागातून बसले होते..

पुणे : प्रवासादरम्यान एका प्रवाशाची बॅग रिक्षामध्येच विसरली होती. ही बॅग सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली होती. तसेच काही रोख रक्कमही दिसली. चालकाने या बॅगसह थेट घोरपडी पोलिस चौकी गाठत बॅग त्यांच्याकडे सुपूर्द केली. प्रवाशाने आधीच हडपसर पोलिसांकडे बॅग रिक्षात विसरल्याची तक्रार केली होती. त्यामुळे नियंत्रण कक्षाकडे ही माहिती पोहचली होती. पोलिस चौकीतून याबाबत संपर्क झाल्यानंतर संबंधित प्रवाशांना बॅग परत करण्यात आली.विठ्ठल मापारे (वय ६०, घोरपडी गाव) असे या प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव आहे. बुधवारी दुपारी खुद्दुस मेहबुब शेख हे पत्नी शहेनाज शेख यांच्यासह मापारे यांच्या रिक्षामध्ये केशवनगर भागातून बसले होते. मापारे यांनी दोघांना हडपसरमध्ये सोडले. रिक्षातून उतरताना ते त्यांची बॅग रिक्षामध्ये विसरले. मापारे यांच्याही लक्षात ही बाब आली नाही. ते रिक्षा घेऊन बी.टी. कवडे रस्त्यावर आले. तिथे इतर रिक्षाचालकांना ती बॅग दिसली. हडपसरला सोडलेल्या प्रवाशांचीच ही बॅग असावी, याची खात्री पटल्यानंतर मापारे यांनी थेट घोरपडी पोलिस चौकी गाठली. मापारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी लगेच हडपसर पोलिस ठाण्यात संपर्क साधून बॅगबाबत माहिती दिली. काही वेळातच नियंत्रण कक्षातून घोरपडीगाव मार्शलला बॅगची माहिती व प्रवाशांचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यांनी प्रवाशांशी संपर्क साधत मुंढवा पोलिस ठाण्यात बोलावले.बॅगमधील साहित्याची खात्री केल्यानंतर शेख यांना बॅग परत करण्यात आली. बॅगमध्ये ११ तोळे सोन्याचे दागिने, २५० ग्रॅम चांदीचे दागिने व २० हजार रुपयांची रक्कम होती. पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपतराव भोसले यांनी मापारे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सत्कार केला.  पोलिस उपनिरीक्षक विजय कदम, सहायक पोलिस फौजदार निसार शेख यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. मापारे हे पुणे शहर जिल्हा वाहतुक सेवा संघटनेचे सदस्य असून अध्यक्ष संजय कवडे व इतर रिक्षाचालकांनीही त्यांचा सत्कार केला.

टॅग्स :Puneपुणेauto rickshawऑटो रिक्षाGoldसोनंPoliceपोलिस