अँब्युलन्स आणि दुचाकीच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू; पुणे -नाशिक महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 19:24 IST2022-09-02T19:24:12+5:302022-09-02T19:24:25+5:30
राजगुरूनगर शहरालगत पुणे -नाशिक महामार्गावर शासकीय विश्रामगृह जवळ शुक्रवारी दि २ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली

अँब्युलन्स आणि दुचाकीच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू; पुणे -नाशिक महामार्गावरील घटना
राजगुरुनगर : पुणे -नाशिक महामार्गावर अँब्युलन्स आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन युवकांचा मृत्यु झाला. आतिष नंदकिशोर सोमवंशी (वय २२ रा. दोंदे ता खेड ) मयुर अशोक पवळे ( वय २३ रा. चांडोली ता. खेड ) असे अपघातात जागीच मुत्यू झालेल्या युवकांचे नाव आहे. राजगुरूनगर शहरालगत पुणे -नाशिक महामार्गावर शासकीय विश्रामगृह जवळ शुक्रवारी दि २ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
अँब्युलन्स नाशिक बाजूने पुण्याच्या दिशेने चालली होती. समोरून आलेल्या दुचाकीची चालकाच्या बाजूने धडक झाली. त्यात काही फूट अंतर दुचाकी ओढत गेली. यामध्ये दुचाकीवरील दोन युवकांचा रस्त्यावर पडुन गंभीररित्या जखमी जागीच मुत्यू झाला. अँब्युलन्स चालक महेश चंद्रकांत वालकोळी (रा. बोरघर ता.आंबेगाव ) यांने खेड पोलिस ठाण्यात अपघाताची खबर दिली आहे.