लिफ्टच्या बहाण्याने पुण्यात परदेशी महिलेवर दोघांचा बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 15:09 IST2019-12-24T15:05:16+5:302019-12-24T15:09:30+5:30
एकीकडे प्रशासनाकडून महिला सुरक्षित असल्याचे दावे होत असताना पुण्यासारख्या मेट्रोपॉलिटियन शहरातही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुण्यातील विमाननगर भागात लिफ्ट मागितलेल्या परदेशी महिलेवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याबद्दल २८ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे

लिफ्टच्या बहाण्याने पुण्यात परदेशी महिलेवर दोघांचा बलात्कार
पुणे : एकीकडे प्रशासनाकडून महिला सुरक्षित असल्याचे दावे होत असताना पुण्यासारख्या मेट्रोपॉलिटियन शहरातही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुण्यातील विमाननगर भागात लिफ्ट मागितलेल्या परदेशी महिलेवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याबद्दल २८ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. मंगळवारी मध्यरात्री १२ ते पहाटे साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,पिडीत तरुणी रात्री १२च्या दरम्यान मुंढवा येथील हॉटेलमधून बाहेर पडली. त्यावेळी मोबाईलवरून घरी जाण्यासाठी कॅब बुक करता असताना पांढऱ्या रंगाच्या बाईकवरून एक तरुण आला. त्याने तिला लिफ्ट दिली आणि फोन करून मित्रालाही बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी तिला बाईकवर मध्यभागी बसवून प्रवासाला सुरुवात केली. संबंधित तरुणीला संशय आल्याने तिने फोनवर तिच्या घराचे लोकेशन टाकून बघितले मात्र ते विरुद्ध दिशेने जात होते. तिने ओरडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तिला मारहाण करून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
त्यानंतर तरुणीच्या विनंतीनंतर त्यांनी तिला मुख्य रस्त्यापर्यंत सोडण्यासाठी पुन्हा लिफ्ट दिली. रस्त्याजवळ आल्यावर तिने आजूबाजूला उभी असलेली मुले बघून ओरडण्याचा प्रयत्न केला. ते मुले त्यांच्याकडे येत असल्याचे बघून त्यापैकी बाईक चालवणाऱ्याचा तोल गेला आणि ते तिघेही पडले. या अपघातात महिलेला दुखापत झाली मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि संबंधित प्रकार उघडकीस आला आहे. या संबंधी अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.