शेलपिंपळगावला पुराच्या पाण्यात दुचाकीस्वार गेला वाहून; गुरुवारी रात्री सापडला मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 04:00 PM2020-10-16T16:00:38+5:302020-10-16T16:01:57+5:30

स्थानिक नागरिकांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये असे सुचवले असतानाही दुचाकीस्वाराने रात्रीच्या वेळी पुराच्या पाण्याच्या प्रवाहात दुचाकी घातली...

Two wheelers driver was swept away in the flood waters at Shelpimpalgaon; The body was found Thursday night | शेलपिंपळगावला पुराच्या पाण्यात दुचाकीस्वार गेला वाहून; गुरुवारी रात्री सापडला मृतदेह 

शेलपिंपळगावला पुराच्या पाण्यात दुचाकीस्वार गेला वाहून; गुरुवारी रात्री सापडला मृतदेह 

googlenewsNext

शेलपिंपळगाव : चाकण -शिक्रापूर हायवे रस्त्यावरील शेलपिंपळगाव हद्दीतील मोहितेवाडी (ता. खेड) येथील ओढ्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात एक दुचाकीस्वार वाहून गेल्याची घटना घडली. संबंधित घटनेत दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे गुरुवारी (दि.१५) उशिरा उघड झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने संबंधित व्यक्तीच्या मृतदेहाचा शोध घेतला आहे.

जनार्दन मारुती डिंबर (वय ४७ मूळगाव रामदासनगर चिखली ता. हवेली) असे संबंधित मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; चाकण - शिक्रापूर राज्यमार्गावरील मोहितेवाडी परिसरातील शिवकृपा पेट्रोल पंपाशेजारील ओढ्याच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना संबंधित दुचाकीस्वार गुरूवारी रात्री पावणे एकच्या सुमारास ओढा ओलांडून पुढे प्रवास करण्याच्या प्रयत्नात असताना दुचाकीसह (एमएच १४ एचएस ५६५५) वाहून गेला. 
        विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांनी संबंधीत व्यक्तीस पुराच्या पाण्यात जाऊ नये असे सुचवले असतानाही स्थानिकांचे न ऐकता डिंबर यांनी पाण्याच्या प्रवाहात दुचाकी घातली. मात्र पुराचा जोर मोठा असल्याने काही क्षणातच डिंबर मोटारसायकलसह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. घटनास्थळी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध घेतला असता घटनेपासून दोन किलोमीटरवर अंतरावर दुचाकी सापडलो. तर गुरुवारी उशिरा मृतदेह आढळून आला.

Web Title: Two wheelers driver was swept away in the flood waters at Shelpimpalgaon; The body was found Thursday night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.