पुणे शहरात शिवाजी पुलावर ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 21:06 IST2023-01-24T21:04:59+5:302023-01-24T21:06:32+5:30
अपघातानंतर पसार झालेल्या अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल...

पुणे शहरात शिवाजी पुलावर ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
पुणे : शिवाजी पुलावर ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. पृथ्वीराज विष्णूकुमार शेळके (वय २२, रा. अंबड, जि. जालना) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी अपघातानंतर पसार झालेल्या अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा नाेंदवण्यात आला आहे.
याबाबत शेळके याचा मित्र प्रज्वल काळे (वय २२, रा. पिंपरी) याने शिवाजीनगर ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पृथ्वीराज शेळके हा औषध उत्पादक कंपनीत विपणन प्रतिनिधी होता. दुचाकीस्वार दोन दिवसांपूर्वी रात्री नऊच्या सुमारास शिवाजी पुलावरून जात असताना भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या शेळकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक विजय पानकर अधिक तपास करत आहेत.