Video: "फुटपाथ वरून दुचाकी? या तुमची आरती ओवाळते", पुण्यातील महिलेचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 16:06 IST2025-12-11T16:04:46+5:302025-12-11T16:06:47+5:30
रस्त्यावर झालेली कोंडीमुळे अनेक दुचाकीस्वार यांनी फुटपाथ वरून जाणं पसंत केलं, पण अशा दुचाकीस्वरांचा या महिलेने अपमान केला

Video: "फुटपाथ वरून दुचाकी? या तुमची आरती ओवाळते", पुण्यातील महिलेचा व्हिडिओ व्हायरल
पुणे : पुण्यात बऱ्याच भागात वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. त्यातून ट्राफिक प्रचंड वाढले आहे. त्यामुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. प्रत्येक माणसाची धावपळ पण इतकी वाढली आहे की, वाहतुकीच्या नियमांकडेही त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. काही जण तर जाणूनबुजून नियम मोडताना दिसून आले आहेत. सिग्नल तोडणे, नो एंट्रीमधून वाहन चालवणे, फुटपाथवरून जाणे असे प्रकार जास्त घडत आहेत. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या दुचाकीस्वारांना महिलेचा पुणेरी महिलेने चांगलाच दणका दिला आहे.
"फुटपाथ वरून दुचाकी? या तुमची आरती ओवाळते", पुण्यातील महिलेचा व्हिडिओ व्हायरल#Pune#SocialMedia#women#Trafficpic.twitter.com/TEMh3MxziZ
— Lokmat (@lokmat) December 11, 2025
पुण्यात पुणेकर तुमचा कुठल्या ही थराला जाऊन अपमान करू शकतात मग तो कधी उपहासात्मक असू शकतो किंवा कधी थेट तुमचा अपमान करणारा सुद्धा असू शकतो. हे या महिलेच्या व्हिडिओमधून दिसत आहे. शहरातील पाषाण भागातून हा व्हिडिओ आता समोर आला आहे .पुण्यातील या व्हिडिओ मध्ये चक्क फुटपाथ वरून दुचाकी चालवणाऱ्या वाहन चालकांना एका महिलेने थेट हाथ जोडत तुमची आरती ओवाळते असा खोचक टोला लगावत आहे. एवढच नाही तर ही महिला त्यांच्या पाठीमागे धावताना सुद्धा दिसत आहे. रस्त्यावर झालेली कोंडीमुळे अनेक दुचाकीस्वार यांनी फुटपाथ वरून जाणं पसंत केलं. पण अशा दुचाकीस्वरांचा या महिलेने अपमान केला. पुण्यातील पाषाण भागातील हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात असून व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.