Two thief theft senior citizen by told police | पोलीस असल्याची बतावणी करून भरदिवसा दोन भामट्यांनी वृद्धाला लुटले 
पोलीस असल्याची बतावणी करून भरदिवसा दोन भामट्यांनी वृद्धाला लुटले 

ठळक मुद्देराजगुरुनगर येथील वाडा रोड येथील घटना

राजगुरुनगर :.पोलिस असल्याची बतावणी करुन दोन भामट्यांनी वृद्धाकडील सोन्याची साखळी , अंगठी असा ४४ हजार रुपये किमतीचा ऐवज लांबवला. शुक्रवारी ( दि. २० ) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वाडारोड (ता. खेड ) संगम गार्डनसमोर प्रकार घडला. याबाबत काशिनाथ महाराज गोपाळे ( वय ५५ )रा. कोहिनुर सोसायटी वाडा रोड ,(ता खेड ) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशीनाथ गोपाळे यांचे वाडारोड येथे किरणा मालाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे आज सकाळी १० वाजता त्यांची नात जान्हवी हिला स्कुल बस मध्ये सोडण्यास गेले होते. परत माघारी येताना संगम गार्डन समोर वाडारोड रस्त्यावर एक अज्ञात इसम दुचाकी लावून उभा होता.गोपाळे हे येताच. त्या इसमाने सांगितले, मी पोलिस आहे. व त्यांचा कडील बनावट पोलिस आयकार्ड गोपाळे यांना दाखवून या रस्त्याला चोरटे आले आहे. तुमच्या हातातील अंगठया, व गळ्यातील चैन रुमालात बांधून ठेवा. दरम्यान, दुसरा चोराटा तिथे आला. त्यालाही खोटी खोटी दमदाटी करून तुला माहित आहे का मी, पोलिस आहे. तुझ्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट व हातातील अंगठ्या काढून रुमालात बांधून ने याठिकाणी चोरटे आले आहे. या इसमाने खिश्यातुन रुमाल काढून घाईघाईने हातातील ब्रेसलेट व अंगठया रुमालात बांधुन रुमाल खिश्यात घातला. गोपाळे यांचा विश्वास संपादन करून गोपाळे यांना या इसमाने सांगितले कि बाबा अंगावर सोने घालून फिरू नका, परिसरात लूटमार सुरू आहे. सोने काढून खिशात ठेवा,' असे सांगितले गोपाळे यांनी लूटमारीच्या भीतीपोटी रुमाल खिश्यातुन काढताच चोरट्यांनी त्यांच्या बोटातील १ तोळा वजनाची सोन्याची अंगठी, अर्धा ग्राम सोन्याची अंगठी, व गळयातील १ तोळ्याची चैन, शर्टच्या वरच्चा खिश्यातील डायरी व रोख ५ हजार रुपये काढून रुमालात बांधुन देत असताना हातचलाखी करून फक्त डायरी व ५ हजार रुपये रुमालांत बांधून त्यांची गाठ मारून गोपाळे यांना खिस्यात घालण्यासाठी दिला. दोन्ही भामट्यांनी दुचाकीवरून पोबारा केला. गोपाळे हे १० मिनिटांनी ते किरणा दुकानात गेले. दरम्यान त्यांनी खिस्यातील रुमाल काढून गाठ सोडली असता फक्त डायरी व ५ हजार रुपये आढळून आले. सोन्याच्या अंगठया व गळयातील चैन गायब असल्याचे निर्दशनास येऊन या भामट्यांनी चोरी केली असल्याचे गोपाळे यांच्या लक्षात आले.पोलिस असल्याची बतावणी करून लूट करण्याचे प्रकार गेल्या वर्षाभरात थांबले होते, मात्र पुन्हा भरवस्तीत असा प्रकार घडल्याने पोलिसांनी गांभीर्याने तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे, असे पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले.

Web Title: Two thief theft senior citizen by told police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.