पुणे-पंढरपूर मार्गावर कार आणि मोटारसायकलचा भीषण अपघात, दोन जण गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 15:32 IST2022-02-26T15:28:06+5:302022-02-26T15:32:48+5:30
दोन जण गंभीर जखमी...

पुणे-पंढरपूर मार्गावर कार आणि मोटारसायकलचा भीषण अपघात, दोन जण गंभीर
नीरा (पुणे) : नीरानजीक (ता.पुरंदर) पालखी महामार्गावरील पिंपरे येथे आज सकाळी कार आणि मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. यामध्ये मोटार सायकलवरील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर कार चालक किरकोळ जखमी झाला आहे.
याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती अशी की, शनिवार दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी नीरा येथील दोन तरूण अवधूत शंकर ठोंबरे व ओंमकार बाळासाहेब लोणार हे व्यायामासाठी पंढरपूर-पुणे पालखी महामार्गावरुन थोपटेवाडी मार्गे गुळुंचे येथील बोलाई देवीच्या डोंगराकडे निघाले होते. पिंपरे येथील नीरा डावा कालव्या जवळील अरुंद रस्त्यावर जेजुरी बाजूकडून आलेल्या भरधाव कारने (क्र.एम एच-२० ई.ई. ४९३८) त्यांच्या मोटार सायकलला (क्र.एम एच- १२ टि.एम. ७३७०) ला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारने रसत्याच्या उजव्या बाजूने जात मोटार सायकलचे पूर्ण नुकसान झाले.
धडकेनंतर मोटार सायकलला २० फुट रसत्याच्या कडेने फरफटत नेले. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कार धडकल्याने ती थांबली यामध्ये कार चालकही जखमी झाला आहे. या सर्व जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज प्रत्यक्षदर्शी लोकांनी व्यक्त केला आहे.