शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅमेझॉन कंपनीला गंडा घालणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 21:50 IST

अ‍ॅमेझॉन कंपनीकडून खरेदी केलेल्या वस्तू काही कारणामुळे परत केल्यानंतर त्याची कंपनीच्या सर्व्हरमध्ये नोंद होत नव्हती़..

ठळक मुद्देसायबर क्राईमने केली कारवाई : १७ लाखांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त  

पुणे : ग्राहकांनी अ‍ॅमेझॉन कंपनीकडून खरेदी केलेल्या वस्तू काही कारणामुळे परत केल्यानंतर त्याची कंपनीच्या सर्व्हरमध्ये नोंद होत नव्हती़. अशा वस्तूंची विक्री करुन कंपनीला २४ लाखांचा गंडा घालणाऱ्या दोघांना सायबर क्राईमने अटक केली आहे़. त्यापैकी एक कंपनीचा कामगार असून तो गेल्या तीन वर्षांपासून कंपनीत काम करीत होता़. त्यांच्याकडून १७ लाख १३ हजार रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत़. राशिद जुम्मन चौधरी (वय २६, रा. धानोरी) व अचल अमोल माणगावकर  (वय २६, रा. धानोरी, मूळ-सावंतवाडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राशिद हा अ‍ॅमेझॉन कंपनीचा कामगार असून त्याचे शिक्षण बी.कॉम झाले आहे. तर अचल राशिदचा मित्र असून त्याने डिप्लोमा इन इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. कंपनीत कामाला असल्याने  ग्राहकाने अ‍ॅमेझॉन कंपनीकडून खरेदी केलेली वस्तू कंपनीकडे माघारी पाठविल्यास कंपनीकडून नवीन वस्तू ग्राहकाला पाठविली जात होती़. मात्र, परत केलेल्या वस्तूची नोंद अ‍ॅमेझॉनच्या सिस्टिममध्ये अपडेट होत नव्हती़. त्याची माहिती रशिदला होती़ ग्राहकाने परत केलेली वस्तू कंपनीला मिळत नसल्याने अ‍ॅमेझॉन कंपनीने अलंकार पोलीस ठाण्याकडे फिर्याद दिली होती़. या गुन्ह्याचा सायबर पोलीस ठाण्यामार्फत तपास करीत असताना अ‍ॅमेझॉन कंपनीच्या वेबसाईटवरुन वारंवार एकाच आयडीवरुन हा प्रकार होत असल्याचे निष्पन्न झाले़. त्याची माहिती कंपनीकडून मिळताच त्याद्वारे तांत्रिक विश्लेषण केल्यावर आरोपी सावंतवाडी येथे असल्याची माहिती मिळाली़. त्यानुसार पोलिसांनी सावंतवाडी येथून अचल माणगावकर याला ताब्यात घेतले़. त्याच्याकडून माहिती मिळाल्यावर त्याचा साथीदार राशिद चौधरी याला पकडले़. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर राशिद व अचल याने १५ ते २० बनावट ई मेल आयडी तयार करुन त्यावरुन विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू मागविल्या होत्या़. त्या वस्तू खराब असल्याचे कारण देत दोघांनी त्यात परत केल्याचे दाखवित़ प्रत्यक्षात त्या परत न करता त्यांची ओएलएक्सवर विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले़ दोघांनी या वस्तूची चोरी करत असल्याची कबुली दिली़. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे, सहायक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, गावडे, हंडाळ, वाव्हळ, पोतदार, वेताळ, जाबा, निकम, जाधव, पुंडलिक, भोरडे, शेख यांच्या पथकाने केली. 

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीPoliceपोलिसArrestअटक