लोणावळ्यात फिरायला गेलेल्या दोघांना चाकूचा धाक दाखवत लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 18:54 IST2023-01-23T18:52:50+5:302023-01-23T18:54:05+5:30
लोणावळा ( पुणे ) : लोणावळा शहरातील सहारा पूल भागात फिरायला गेलेल्या दोघांना चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना रविवारी २२ ...

लोणावळ्यात फिरायला गेलेल्या दोघांना चाकूचा धाक दाखवत लुटले
लोणावळा (पुणे) : लोणावळा शहरातील सहारा पूल भागात फिरायला गेलेल्या दोघांना चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना रविवारी २२ जानेवारीला घडली.
सलमान उस्मान खान (वय १९, व्यवसाय शिक्षण रा. टेबल चाळ जी वार्ड लोणावळा) याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सलमान व त्याची मैत्रीण हे काल रात्री लोणावळा ब्रीजच्या पुढे फिरायला गेले असताना त्याठिकाणी असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. त्यासोबतच सलमान याच्या हातावर चाकूने वार करून गंभीर जखमी करत त्याच्या जवळील आय फोन, त्याच्या मैत्रिणीकडील सोन्याची दोन तोळ्याची चैन व चांदीची अंगठी असा एक लाख १२ हजार ४०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेत लुटला.
सलमान याने दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे तपास करत आहेत.